हत्तीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, काही व्हिडिओ मजेशीर असतात, काही भितीदायक असतात तर काही भावुक करणारे असतात. काही दिवसांपूर्वीच अंगावर शहारा आणणारे हत्तीचे व्हिडिओ चर्चेत आले होते ज्यामध्ये एका हत्ती त्याच्यावर भुंकणाऱ्या कुत्र्याच्या अंगावर धावून गेला होता त्यानंतर केरळमधील एका उत्सवादरम्यान पिसाळलेल्या हत्तीने एका व्यक्तीला सोंडेत पकडून दिले होते. त्याचबरोबर मादी हत्ती आणि तिच्या पिल्लाचा व्हिडिओ समोर आला होता ज्याने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे.

दरम्यान आता नेटकऱ्यांना थक्क करणारा हत्तीचा व्हिडिओ चर्चेत आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये हत्तीने अशी करामत करून दाखवली आहे ज्याची कल्पनाही कोणी केली नसेल. हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

व्हिडिओ इंस्टाग्रामवर explainingeverythings नावाच्या पेजवर पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये एक हत्ती अंघोळ करत आहे. हत्तीचा मालक त्याच्या अंगावर पाईपने पाणी मारत आहे. हत्ती मस्त पाण्यात खेळत आहे. अचानक हत्ती त्याचे डोके जमिनीवर टेकवतो आणि पुढील दोन पायावर शरीराचा संपूर्ण भार टाकतो आणि मागील दोन पाय हवेत उचलतो. जे पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. हत्ती हवेत पाय उभे करून उभा राहिला यावर नेटकऱ्यांचा विश्वास बसत नाही. व्हिडीओमध्ये शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की,” हत्ती त्यांच्या पुढच्या पायांवर आणि डोक्यावर उभे राहू शकतात आणि असे करणे त्यांच्यासाठी एक सामान्य गोष्ट आहे. खरं तर, हत्तीचे पिल्लू प्रौढत्वासाठी सराव करताना अनेकदा असे करताना दिसतात. हत्ती हे पृथ्वीवरील सर्वात मोठे भूचर आहेत. सर्कस आणि शोमध्ये त्यांचे अनेकदा शोषण केले जाते, जिथे त्यांना अनैसर्गिक युक्त्या करण्यास भाग पाडले जाते.”

हेही वाचा – थेट एसटी बसच्या छतावर बसून माकडाचा ऐटीत प्रवास! Viral Video पाहून नेटकरी म्हणे, “तिकीट काढले का?”

व्हिडिओ पाहून थक्क झालेल्या नेटकऱ्यांनी काही कमेंटस देखील केल्या आहेत. एकाने म्हटले,”ज्या पद्धतीने तो पाय पुन्हा जमिनीवर ठेवतो तो खरंच प्रोफेशनल वाटतो.”

हेही वाचा – पुण्यात हे काय चाललंय? बाईकवरून जाताना तोल गेला; तरुण गाडीसह ड्रेनेजच्या खड्ड्यात पडला, पुण्याचा थरारक Video

दुसर्‍याने म्हटले की, बाप रे, ८ ते १२ टन किलो वजनाचा हत्ती हे करू शकतो हे खरंच कौतुकास्पद आहे.

काहींनी मजेत हत्ती योगा करतो किंवा जीमनॅस्टिक करतो अस म्हटले आहे तर कोणी म्हणे हत्ती शीर्षासन करतोय असे म्हटले आहे.

Story img Loader