सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातले काही आपलं मनोरंजन करतात तर काही आपल्याला विचार करायला भाग पाडतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक हत्ती रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांकडून टोल (टॅक्स) वसूल करत असल्याचे दिसत आहे. त्याचा टोल घेतानाचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ एका अधिकाऱ्याने शेअर केला आहे.
काय आहे नक्की व्हायरल व्हिडीओमध्ये?
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक हत्ती रस्त्यावर उभा असल्याचे दिसत आहे. कारमध्ये बसलेली एक व्यक्ती केळीचे घड घेऊन जात आहे. मग तो सर्व केळी एका हत्तीला देतो. त्या केळी म्हणजेच टोल आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक कमेंटही करत आहेत. हा खरोखरच भावनिक व्हिडिओ आहे.
(हे ही वाचा: या फोटोत लपलाय बिबट्या, तुम्ही शोधू शकता का?)
अधिकाऱ्यांनी शेअर केला व्हिडीओ
हा व्हिडीओ आयपीएस (IPS) अधिकारी दीपांशु काबरा यांनी शेअर केला आहे. त्यांनी व्हिडीओसोबत एक कॅप्शनही लिहिले आहे. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे ‘सर्वात गोड टोल कलेक्शन, म्हणजे सुंदर टोल टॅक्स कलेक्टर.’
(हे ही वाचा: बँक लॉकरमध्ये सापडलं ५०० कोटी किमतीचे पन्ना शिवलिंग, आहे १००० वर्षे जुनं)
(हे ही वाचा: अन् तो वाघाच्या मागे चालू लागला…; हा Viral Video एकदा बघाच!)
नेटीझन्सच्या प्रतिक्रिया
आतापर्यंत हा व्हिडीओ १९ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओवर अनेक कमेंट्सही पाहायला मिळत आहेत. या व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहीले आहे ‘हा खूप क्यूट व्हिडीओ आहे. हृदयस्पर्शी क्षण.’ दुसऱ्या युजरने कमेंट केली की ‘असा क्षण कधी कधी पाहायला मिळतो.’