‘रतन टाटा’.. टाटा उद्योगसमूहाचे मालक, यशस्वी उद्योगपती आणि जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक. पण रतन टाटा हे फक्त पैशांनीच नाही तर मनानेही तितकेच श्रीमंत आहे. माणूस कितीही मोठा झाला तरी त्याच्या अंगी जर विनम्रता नसेल तर ते मोठेपण काय कामाचे? विनम्रता हेच तर रतन टाटांचे तत्त्व आहे. म्हणून त्यांच्याकडे पाहिलं की आदर वाटतो. फेसबुकवर सुमीत नागदेव नावाच्या व्यक्तीने ताज हॉटेलमधला एक किस्सा शेअर केला आहे. माणूस म्हणून ते कसे आहेत हे जाणून घ्यायचं असेल तर रतन टाटांचा हा किस्सा प्रत्येकांनी जरूर वाचला पाहिजे.
वाचा : जंक फूड खाऊन १० वर्षांच्या मुलाची झाली ही स्थिती
सुमितने फक्त ५० सेंकदच रतन टाटांना पाहिलं पण एवढ्याशाही भेटीत तो खूप काही शिकला. कामानिमित्त रतन टाटा ताजमध्ये आले होते, एवढे मोठे उद्योगपती पण कोणताही लवाजमा सोबत न घेता अत्यंत साधेपणाने ते हॉटेलमध्ये आले. टाटा श्रीमंत असले तरी आजही आलिशान महागड्या गाडीने न येता अत्यंत साधी गाडी घेऊन ते हॉटेलमध्ये आले. विशेष म्हणजे त्यांच्याकडे चालकही नव्हता. ते स्वत: गाडी चालवत आले होते. सुमितला या प्रसंगाने खूपच आश्चर्य वाटले. जेव्हा सुमितने हॉटेलमधल्या एका सुक्षकारक्षकाकडे चौकशी केली तेव्हा त्याला टाटांबद्दल आणखी एक गोष्ट कळली.
हॉटेलमध्ये येताना नेहमी रतन टाटा पार्किंगच्या रांगेतून येतात. खुद्द हे हॉटेल त्यांच्या मालकीचे असले तरी व्हीव्हीआयपी सेवा त्यांना आवडत नाही. कधीही ते याचा उपयोग करत नाही. नेहमी ते पार्किंगच्या रांगेतून आपली गाडी चालवत येतात. गेटवर सुरक्षारक्षक प्रत्येक गाडीची कसून तपासणी करतात. आता खुद्द टाटांची गाडी कशी तपासायची असा प्रश्न अनेकदा त्यांना पडतो. पण आपल्या गाडीची तपासणी केल्याशिवाय ते कधीच पुढे जात नाही, असेही एका सुरक्षारक्षकाने त्यांना सांगितले.