साउथ सुपरस्टार विजय आणि अभिनेत्री पूजा हेगडे यांचा आगामी चित्रपट ‘बीस्ट’ मधलं ‘अरबी कुथू’ गाणे (अरबीकुथू गाणे) सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करतंय. आहे. लहान्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांना या गाण्याचं वेड लागलंय. प्रत्येकजण अरबी कुथू – हलमिथी हबीबो गाण्यांवर डान्स करत आपआपले नव नवे व्हिडीओ शेअर करताना दिसून येत आहेत. #ArabicKuthuChallenge हा हॅशटॅग सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करतोय. आता या गाण्याची क्रेझ परदेशातही पाहायला मिळत आहे. अलीकडेच साऊथ कोरियन बॅण्डच्या मुलांनी एकत्र येत हलमिथी हबीबो या गाण्यावर डान्स केला आहे. हा डान्स व्हिडीओ पाहून भारतीय सुद्धा या परदेशी मुलांच्या प्रेमात पडले आहेत. याचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर विशेषत: भारतीय या बॅण्ड बॉईजवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. mallu_bangtan_babyy नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओमध्ये BTS बॅण्डच्या मुलांनी सुपरस्टार विजय याच्या ‘हलमिथी हबीबो’ गाण्यातील हूकस्टेप्सना हुबेहुब फॉलो करण्याचा प्रयत्न केलाय. BTS बॅण्डच्या मुलांचे जबरदस्त डान्स मूव्ह्स पाहून भारतीयांनी तर या व्हिडीओवर कमेंट्स सेक्शनमध्ये कौतुकाचा वर्षाव केलाय. “काय अप्रतिम डान्स केला आहे या मुलांनी.” अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर येत आहेत. या बॅण्ड बॉईजच्या मुलांचे इतके उत्कृष्ट डान्स स्टेप्स आहेत, की कोणाचाही आपापसातले ट्यूनिंग बिघडताना दिसत नाही.

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
jaipur tanker blast injured people condition Bandages all over the body but viral video real or fake read fact check
जयपूरमधील स्फोटात होरपळलेल्या लोकांचे हाल? संपूर्ण शरीरावर बँडेज, धड चालताही येईना, पण या व्हायरल व्हिडीओची खरी बाजू पाहा
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
Virat Kohli Depicted as Clown in Australian Newspaper After on-field bust up with Sam Konstas in Melbourne IND vs AUS
IND vs AUS: ‘विराट कोहली जोकर’, ऑस्ट्रेलियन मीडियाने कोन्स्टासबरोबरच्या वादानंतर विराटला केलं लक्ष्य, वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर असा फोटो…

आणखी वाचा : नशीब म्हणायचं की चमत्कार? भल्यामोठ्या ट्रकनं उडवलं, तरीही वाचला जीव; पाहा Shocking VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : ‘कच्चा बादाम’वर शाळकरी मुलीने केला क्यूट डान्स, पाहा हा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला १० हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ‘देसी आर्मी’ नावाच्या पेजवरून देखील या व्हिडीओवर कमेंट्स मिळाल्या आहेत. सर्व देसी BTS चाहत्यांसाठी ट्रीट म्हणून आणखी एक दुसरा व्हिडीओ युट्यूबवरही अपलोड करण्यात आलाय. हलमिथी हबीबो या गाण्यावर तयार केलेला हा फॅन-एडिट व्हिडीओ आहे. या व्हिडीओला सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय.

आणखी वाचा : आईला वैतागून चिमुकलीने देवाकडे केली ही प्रार्थना, Viral Video पाहून तुम्ही सुद्धा पोट धरून हसाल

इथे पाहा व्हिडीओ :

आज जगभरात प्रसिद्ध बॅण्ड बीटीएसचा डंका वाजत आहे. BTS चे खरे नाव Bangtan Boys आहे. Bangtan Boys ची सुरुवात २०१० मध्ये झाली. या बॅण्डमध्ये एकूण ७ तरुण मुले आहेत, ज्यांनी जगभरात आपल्या दमदार संगीताने सर्वांना वेड लावले आहे. बीटीएसने २०१३ मध्ये बिग हिट एंटरटेनमेंटच्या सहकार्याने व्यावसायिक पदार्पण केले. मुळात हा बॅण्ड हिप-हॉप संगीत बनवतो.

Story img Loader