काही वर्षांपूर्वी आलेल्या ‘धमाल’ चित्रपटातल्या दिवंगत अभिनेते विनय आपटे यांचा प्रसिद्ध संवाद तुम्हाला आढवतो का? एका दक्षिण भारतीय अय्यर नावाची भूमिका ते साकारात असतात तेव्हा त्यातला एक हिरो त्यांना त्यांचे नाव विचारतो. मग ते आपले नाव सांगायला सुरू करतात. अय्यर.
वेणूगोपाळ अय्यर.. मुत्तूस्वामी वेणूगोपाळ अय्यर.. चिन्नस्वामी मुत्तूस्वामी वेणूगोपाळ अय्यर.. परंबतूर चिन्नस्वामी मुत्तूस्वामी वेणूगोपाळ अय्यर आणि पुढे अगदी प्रवास संपेपर्यंत काही त्यांचे नाव सांगून पूर्ण होत नाही. अशीच आणखी एका पेनाची जाहिरात आहे त्यातही पूर्ण पान भरेल इतके लांबलचक नाव एका व्यक्तीचे असते. आता तुम्ही विचार करा इतके लांबलचक नाव कोणी आपल्या मुलाचे कशाला बरे ठेवेल. त्यामुळे केवळ विनोदनिर्मिती म्हणून हे दाखवले असेल हे तुम्हा आम्हाला माहितीय. पण अशीही काही लोक असतात ज्यांना आपल्या मुलाचे नाव लांबलचक ठेवायला आवडते. एक मुलगा आहे ज्याचे एक दोन नाही तर तब्बल चाळीस नावे आहेत.आता कल्पना करा चाळीस नाव असलेला हा मुलगा आपले नाव कसे लक्षात ठेवत असेल आणि ठेवलेच’ ए तुझ नाव काय’ असे विचारल्यास आपले नाव सांगायला त्याला किती वेळ लागत असते. तेही जाऊद्या फक्त पहिले नाव लिहायचे झाले तरी त्याच्या वहिची दोन पाने तर अशीच भरत असतील.
मुळचा फिलिपिन्सचा असलेल्या रात्झिल नावाच्या मुलाला ४० नावे आहेत. सगळ्यात मोठे नाव असल्याचा विक्रमच या मुलाच्या नावे जमा होण्याची चिन्ह दिसतायत रात्झिल फक्त अठरा वर्षाचा आहे आणि फिलिपिन्समधल्या शाळेत आपले उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण करत आहे. फिलिपिन्स डेली इन्क्वायररने याबद्दलची बातमी दिली आहे. या मुलाचे रात्झिल टिमशेल इस्माइल झेरूबाब्बाले झाबुद झायमरी असे लांबलचक नाव सुरू होते हे नाव पूर्ण बोलायचे झाले तर इतका दम लागेल की विचारायची सोय नाही. रात्झिलच्या आजोबांना देखील अशीच नाव ठेवायची सवय होती. त्यांना चार मुले होती. त्यांचीही नाव त्यांनी अशीच काहिशी ठेवली होती आणि ओळखू यावे यासाठी त्याच्या पुढे पाहिला, दुसरा, तिसरा असे प्रत्यय लावले होते. रात्झीलच्या भावंडाची नाव ही अशीच आहेत . त्याच्या भाऊ आणि बहिणीला २० नावे आहेत.