अनेकजण यश प्राप्त करण्यासाठी उत्सुक असतात. आयुष्यात असं काहीतरी मिळवायचं असत ज्याने समाधान मिळेस. ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. हे करत असताना प्रत्येकाच्या यशाच्या व्याख्या वेगळ्या असतात. कोणाला श्रीमंत होणं म्हणजे यशस्वी होण्यासारखं वाटतं, कोणाला प्रसिद्धीचा शिखर गाठणं म्हणजे यशाला गवसणी घालण्यासारखं वाटतं तर कोणाला पद, प्रतिष्ठा, मान मिळवणं म्हणजे यश वाटतं. यशाच्या व्याख्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असल्या तरी यश मिळवण्याचे काही मार्ग मात्र सारखेच असतात. यशाच्या मार्गावरून चालण्यास सुरूवात करताना हे फंडे लक्षात ठेवा. त्यामुळे ध्येय साध्य होण्यास नक्कीच मदत होईल
१ : माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा
तुम्हाला काय हवं आहे याचा विचार करा. त्याबद्दल अधिकाअधिक माहिती मिळवा. त्या गोष्टीबद्दल ज्ञान वाढवा, जितका तुमचा त्या गोष्टीविषयीचा अभ्यास अधिक असेल तितकी तुमची क्षमता अधिक वाढत जाईल. दररोज नवीन काहीतरी शिकण्याची वृत्ती ठेवा, नव्या वाटा शोधण्याचा प्रयत्न करा. कोणतीही गोष्ट हातात घेतल्यानंतर त्याचे लगेच परिणाम दिसतील हे गृहित धरू नका, त्यासाठी वाट पाहण्याची तयारी ठेवा.
२. यशाचा प्रवास अधिक मजेशीर बनवा
अनेकदा काही गोष्टी करताना ताण, थकवा नकारात्मक भावना निर्माण होणं साहाजिकच आहे. पण जर तुम्ही कामात मज्जा निर्माण केली, उत्साह भरला, ते काम अधिक चांगल्या प्रकारे करण्यासाठी नवनवीन योजना आखल्या तर नक्कीच यशाचा प्रवास मजेशीर होऊ शकतो. त्यामुळे ताण हलका करण्यासाठी जास्तीत जास्त सकारात्क उर्जा स्वत:मध्ये आणा. प्रत्येक गोष्टीकडे गंभीरपणे बघून चालत नाही काहीवेळा त्यात मजाही निर्माण करण्याचा प्रयत्न करा. त्या गोष्टीकडे ओझं म्हणून बघण्याचा दृष्टीकोन थांबवा.
३. कल्पनाशक्तीला चालना द्या
कल्पनाशक्ती ही सर्वात मोठी देगणी आहे. कोणतीही गोष्ट करायला घेताना कल्पनाशक्ती वाढवा. एखादी गोष्ट वाईट आहे किंवा परिस्थिती वाईट आहे म्हणून तिला दुषणं देणं बंद करा, कल्पनाशक्ती वापरून ती परिस्थिती चांगली होऊ शकते? ती कशी होऊ शकते? या गोष्टी मनाला पटवून द्या. क्रिएटीव्ह काम करताना जास्तीत जास्त कल्पनाशक्तीला वाव द्या, यातून तुमच्यापुढे अनेक पर्याय खुले होत जातील.
४. मन विचलीत करणाऱ्या गोष्टींपासून दूर रहा
तुमचं ध्येय ठरवल्यानंतर मन विचलित करणाऱ्या गोष्टींपासून चार हात दूरच राहा. कारण या गोष्टी तुमचा मार्ग कधी भरकटवतील सांगता येत नाही. त्यामुळे तुमचं मन विचलित करतील अशा गोष्टींची यादीच बनवा. ही यादी नेहमीच स्वत:च्या जवळ ठेवा. जेव्हा कधी आपल्या ध्येयापासून आपण भरकटतो आहे असं वाटेल तेव्हा तेव्हा ही यादी तुम्हाला लक्ष केंद्रीत करण्यासाठी मदत करणार आहे हे लक्षात ठेवा.
५. अवलंबून राहणं थांबवा
यशस्वी व्हायचं की नाही हे सर्वस्वी आपल्याच हातात आहे, स्वत:शिवाय कोणीही तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी मदत करू शकत नाही हे नेहमीच लक्षात ठेवा. त्यामुळे तो किंवा ती मला मदत करेल मग मी पुढे जाईन असा विचार करणं थांबवा.