जसे मुंबईतल्या त्यातूनही लालबाग परिसरातील भव्य गणेश मूर्तींच्या मिरवणुकी या तमाम मुंबईकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. लाखो भाविक या मिरवणुका पाहण्यासाठी येतात. आता पुण्याचेही तसेच आहे. सांस्कृतिक राजधानी असलेल्या या शहरात ढोल ताशांच्या गजरात बाप्पांची विसर्जन मिरवणूक निघते. त्यामुळे या दोन्ही शहरातील तरुण तरुणी आपापल्या मित्र- मैत्रिणींना विसर्जन मिरवणुकीतील फोटो, गणपतीचे फोटो व्हाट्स अॅप, फेसबुकवर पाठवत असतात. पण यंदा या सगळ्यांपेक्षा एक फोटो मात्र खूपच व्हायरल झाला आहे. गणेश मूर्ती, सजावट किंवा हटके मिरवणूक अशा कोणत्याच कारणामुळे हा फोटो व्हायरल झाला नसला तरी तो व्हायरल होण्यामागचे कारण जरा हटके आहे. हे कारण म्हणजे या मंडळाचे हटके नाव. तसे आपल्याकडे गणपती मंडळाला एखाद्या व्यक्तीचे, त्या इमारतीचे, परिसराचे फारफार तर देवाचे नाव देण्याची पद्धत आहे. पण या मंडळाचे नाव या सगळ्यांपेक्षाही वेगळे आहे. या मंडळाने आपल्या मंडळाचे नाव चक्क ‘टांगा पलटी घोडे फरार’ असे ठेवले आहे. तसे आपल्याकडे एखादी मोठी गोष्ट विस्कटली किंवा काहींनी काढता पाय घेतला तर अशावेळी ही म्हण वापरली जाते. पण मंडळाचे हे नाव ठेवण्यामागे मंडळाची काही ठोस भूमिका जरी कळली नसली तर मिरवणुकीत असे नाव असलेल्या या मंडळाची चर्चा मात्र चांगलीच रंगली आहे.
गणपती बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकी दरम्यानचा हा फोटो आहे. पुण्याजवळील भोसरीचे हे मंडळ आहे. हे मंडळ फारसे जुनेही नाही २००४ मध्ये या मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा