Viral Menu Card from Pune: “पुणे तिथे काय उणे”, म्हणतात ते उगाच नाही. असं काही नाहीये जे पुण्यामध्ये भेटत नाही. अगदी अंतरंगी लोकांपासून ते पुणेरी पाट्यांपर्यंत पुण्यात एकापेक्षा एक गोष्टी पाहायला मिळतात. पुणेरी पाट्या जगभर प्रसिद्ध आहेतच आता पुणेरी मेन्युकार्डही चर्चेचा विषय ठरत आहे.

पुणेरी पाट्या म्हणजे कोणाशीही न बोलता आणि न भांडता जे सांगायचं ते पोहचवणे. हे कौशल्य फक्त पुणेकरांकडेच आहे. याच कौशल्याचा वापर एका दुकानदाराने त्याचा हटके मेन्युकार्ड तयार केले आहे जे वाचून नेटकऱ्यांना हसू आवरणे कठीण झाले आहे.

सैराट हॉटेलचं झिंगाट मेन्यू कार्ड!

व्हायरल फोटोमध्ये पाहू शकता की, एक फालुदा शॉपचे मेन्युकार्ड आहे. सर्व प्रथम सैराट स्पेशल फालुदा असे दुकानाचे नाव आहे ज्याची किंमत ५० रुपये दिली आहे. त्यानंतर पुण्यातील टिळक रोडवर एस पी कॉलेज जवळ असा पत्ता दिला आहे. त्यानंतर स्पेशल क्वालिटी मेन्यु दिला आहे. ज्यामध्ये पहिल्यांदा “काहीच नको” असा मेन्यु दिला आहे ज्यांची किंमत ३० रुपये दिली आहे. हा मेन्यु खास त्यांच्यासाठी आहे ज्यांना हॉटेलमध्ये येऊन काहीच नको असते. त्यांना काय खाणार विचारले तर मला काहीच नको म्हणतात.

  • त्यानंतर दुसरा मेन्यु आहे फक्त पाणी पिणे ज्याची किंमत २० रुपये आहे. अनेकदा हॉटेलमध्ये येऊन लोक काहीच खात नाही, फक्त पाणी पितात. अशा लोकांसाठी हा खास मेन्यु तयार केला आहे.
  • तिसरा मेन्यु आहे. पेपर नॅपकिन वाया घालविणे ज्याची किंमत २० रुपये इतकी आहे. काही लोकांना हॉटेलमध्ये गेल्यावर गरज नसतानाही विनाकारण टिश्य वापरायचे असतात. अशा लोकांसाठी हा खास मेन्यु ठेवलेला आहे.
  • चौथा मेन्यु आहे वाट पाहात टाईमपास करणे ज्याची किंमत ५० रुपये प्रति तास इतकी आहे. अनेकदा लोक हॉटेलमध्ये सहज वेळ घालवण्यासाठी किंवा कोणाची तरी वाट पाहण्यात घालवतात. अशा लोकांसाठी खास मेन्यु तयार केला आहे.
  • पाचवा मेन्यु खास आहे बडीशेप खिशात भरून नेणे ज्यांची किंमत २० रुपये आहे. हा खास मेन्यु त्या लोकांसाठी आहे ज्यांना हॉटेलमध्ये गेल्यावर खिशात बडीशेप भरायला घरी न्यायला आवडते.
  • सहावा मेन्यु आहे मेनू कार्ड वाचून निघून जाणे ज्याची किंमत २०रुपये आहे. हा मेन्यु खास त्या लोकांसाठी आहे जे हॉटेलमध्ये येतात, मेन्युकार्ड पाहतात पण काही ऑर्डर करत नाही किंवा काही खात नाही आणि तसेच निघून जातात.
  • शेवटी धन्यवाद पुणेरी मालक असे लिहिले आहे. हा मेन्युकार्ड वाचल्यानंतर नेटकऱ्यांना हसू आवरणे अशक्य झाले आहे. नेटकऱ्यांना हा मेन्युकार्ड प्रचंड आवडला आहे.

व्हिडिओ इंस्टाग्रामवर maze.pune पेजवर पोस्ट केला आहे. काहींनी कमेंट केल्या आहे. एकाने लिहिले की, “पुणे तिथे काय उणे!” तर दुसऱ्याने कमेंट केले,”मालकाला शिव्या देणे फुकट”