Viral Video : आजकाल अनेक तरुण मंडळी तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी नियमित व्यायाम करतात. व्यायामशाळेत जाऊन व्यायाम करणं कॉलेजमधील विद्यार्थ्यांपासून ते ऑफिसमध्ये जाणाऱ्या मंडळींपर्यंत अनेकांना आवडतं. पण व्यायाम करण्याच्या साधनांच्या मदतीनं बरेच जण मजेशीर व्हिडीओ बनवून स्वतःच्या जीवाशी खेळताना दिसून येतात. आज सोशल मीडियावर असंच काहीसं पाहायला मिळालं आहे. व्यायामशाळेच्या उपकरणांशी मजा-मस्ती करणं एका महिलेला चांगलंच महागात पडलं आहे.

व्हायरल होणारा व्हिडीओ एका व्यायामशाळेतील आहे. सुरुवातीला एक महिला ट्रेडमिलवर बसली आहे. व्यायाम करताना थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी महिला ट्रेडमिलवर आरामात बसताना दिसते. बघता बघता, ट्रेडमिलवर पाय ठेवताच ती घसरते आणि वेगात समोरच्या आरशाला जाऊन आदळते. ट्रेडमिल चालू असल्यामुळे महिला घसरून जमिनीवर आदळते. जर ट्रेडमिल बंद असती, तर त्या महिलेला अशा समस्येला सामोरं जावं लागलं नसतं. व्यायामशाळेत साधनांशी मजा-मस्ती करणं महिलेला कसं महागात पडलं ते एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच.

school Annual day function viral video
‘शाळेच्या त्या सोनेरी आठवणी…’ मैदानात सराव, मेकअपसाठी एकच फाउंडेशन अन् बरंच काही; VIRAL VIDEO पाहून आठवेल शाळेतला वार्षिकोत्सव
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
ladies group dance on Hoti Hai Peelings Hoti Hai Feelings song video goes viral on social media
“होती है फीलिंग्स होती है फीलिंग्स” म्हणत चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
dance of women on Zapukzhupuk
‘आरारारा खतरनाक…’ चाळीतल्या महिलांचा झापुक झुपूक गाण्यावर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
Bull attacked a person while he was dancing in front of him viral video on social media
बैलाशी मस्ती आली अंगाशी! माणसाच्या ‘या’ कृत्यामुळे बैल पिसाळला, शिंगाने उडवलं अन्…, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय झालं?
viral video
VIDEO : असे विद्यार्थी मराठी शाळेतच घडू शकतात! संगणकालाही टक्कर देतात हे विद्यार्थी, अनोखी कला एकदा पाहाच
Shocking Dance Video
असा जीवघेणा डान्स तुम्ही आयुष्यात कधी पाहिला नसेल, तरुण टॉवरच्या रेलिंगवर उभे राहिले अन्…; पाहा धडकी भरवणारा VIDEO

हेही वाचा… महिलेचा Neck Dance पाहून तुमचीही मान दुखायला लागेल? व्हायरल व्हिडीओ पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

व्हिडीओ नक्की बघा :

ट्रेडमिलवर बसून मस्ती करणं पडलं महागात :

अगदी घसरगुंडीवर बसून लहान मुलं ज्याप्रमाणे आनंद लुटतात, तसंच काहीसं ही महिला व्हिडीओत करण्याचा प्रयत्न करताना दिसून आली आहे. पण, अशा प्रकारे मस्ती करणं त्या महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. महिला ट्रेडमिलवर आरामात बसण्याचा प्रयत्न करीत होती. खाली बसून ट्रेडमिलवर पाय ठेवताच ती घसरली आणि जमिनीवर पडली; जे पाहून तुम्ही काही क्षणांसाठी थक्क व्हाल. चुकीच्या ठिकाणी बसून कोणतीही काळजी न घेतल्यामुळे महिलेसोबत हा भयंकर प्रकार घडला, असं म्हणायला हरकत नाही.

व्यायामशाळेतील उपकरणं वजनदार असतात. त्यामुळे त्यांचा वापर करताना काळजी घेणं महत्त्वाचं असतं. पण काही जण या साधनांना खेळणं समजतात आणि व्हिडीओतील महिलेप्रमाणे मजा-मस्ती करून स्वतःवर संकट ओढवून घेतात. सोशल मीडियावर महिलेचा हा व्हिडीओ @brainless या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी विविध प्रतिक्रिया कमेंटमध्ये व्यक्त करताना दिसून आले आहेत.

Story img Loader