आजवर आपण अनेक प्राण्यांना पाण्यात पोहताना आणि मजा करताना पाहिलं असेल. पण तुम्ही कधी घोड्याला पाण्यात पोहताना पाहिलं आहे का? सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक घोडा पोहण्याचा आनंद घेताना दिसत आहे. विशेष म्हणजे हा घोडा इतका सहजपणे पोहत आहे की व्हिडीओ बघणाऱ्या प्रत्येकालाच आश्चर्य वाटेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खोल पाण्यात पोहण्याची घोड्यांची नैसर्गिक प्रवृत्ती असते. पाण्यात प्रवेश केल्यानंतर, घोडे त्यांचे पाय पॅडलसारखे हलवतात, ज्यामुळे ते पोहतात. घोडे त्यांच्या प्रचंड फुफ्फुसामुळेही पोहण्यास सक्षम आहेत. परंतु पाण्यात श्वास घेता येत नसल्याने साहजिकच ते आपले डोके पाण्याच्या बाहेर ठेवून पोहतात. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात तपकिरी रंगाचा घोडा पुलमध्ये अगदी सहज पोहताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की हा घोडा पोहण्याचा आनंद घेत आहे. तसेच, तो कॅमेरामध्ये पाहून हसतानाही दिसत आहे.

Viral Video : तुम्ही कधी मगरीला हसताना बघितलं आहे का? नसेल, तर हा व्हिडीओ बघाच

कुत्रा समलिंगी असल्याचं समजून काढलं घराबाहेर; नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप

हा व्हिडीओ ‘नेचर’ या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमधील घोड्याला पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. नेटकरी या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रियाही देत आहेत. एका युजरने म्हटलं की, ‘मी माझ्या आयुष्यात कधीच घोड्यांना पोहताना बघितलं नाही.’ तर दुसऱ्या युजरने म्हटलंय की ‘पोहणाऱ्या या घोड्याला पाहून खूपच छान वाटत आहे.’

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This horse is enjoying swimming netizens were shocked to see the video pvp