पहिलं प्रेम..त्या जुन्या आठवणी..सोडून गेलेला तो…आणि बरंच काही…कसं विसरावं? अनेकांनाच हा प्रश्न पडतो. पहिल्या प्रेमाची जादूच काही वेगळी असते. लहानपणी तुम्हीही एखाद्याच्या प्रेमात पडला असाल. ते प्रेम जरी तुम्हाला मिळालं नसलं तरी हृदयात कुठेतरी ती व्यक्ती असते. सिल्विना जेनिफर या तरुणनेही अशीच एक हृदयस्पर्धी पण अपुरी प्रेमकथा सांगितली. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अनेकांना जगण्याची, पुन्हा प्रेम करण्याची नवी उमेद देत आहे.
१० वर्षांची असताना सिल्विनाची एका लग्नसोहळ्यात त्याच्याशी ओळख होते आणि दोघांमध्ये मैत्री जमते. पण जसजसे ते मोठे होत गेले, तसतसा त्यांच्यातील संपर्क कमी होऊ लागला. तो मुलगा दुसरीकडे राहायला गेला. २०११ मध्ये सोशल मीडियाच्या साहाय्याने सिल्विना पुन्हा एकदा त्याच्या संपर्कात आली. मुलाच्या आईवडिलांनी तिला लग्नासाठीही विचारले, पण त्यावेळी तिने नकार दिला. कारण एकमेकांवर प्रेम करून त्यानंतर लग्न करावं अशी तिची इच्छा होती. काही दिवसांनंतर त्या मुलाचे दुसरीकडे लग्न जुळल्याची माहिती तिला मिळाली. पण नियतीनेही काही वेगळेच निश्चित केले होते. काही कारणांमुळे त्या मुलाचे लग्न मोडले आणि पुन्हा एकदा तो सिल्विनाच्या संपर्कात आला. दोघांमधील जुनी मैत्री पुन्हा एकदा बहरू लागली. मैत्रीचे रुपांतर प्रेमातही झाले पण अचानक अनपेक्षित अशी घटना घडली.
जेनिफरची ही प्रेमकथा अपुरी जरी असली तरी अनेकांना नवी उमेद देत जीवनाची सकारात्मक बाजू सांगत आहे. व्हिडिओच्या अखेरीस तिने दिलेला संदेश तुम्हालाही एक नवी उमेद देऊ शकेल.