परदेशी जाऊन स्थायिक होणं प्रत्येकाला आवडतं. त्यासाठी उच्च शिक्षण घेऊन परदेशातील नोकरीच्या शोधात अनेक भारतीय तरुण आहेत. विविध क्षेत्रातील हे तरुण परदेशीय स्थायिक होऊन चांगला पैसा कमावतात. कॅनडात राहणारं हे जोडपं वर्षाकाठी तब्बल दोन कोटी रुपये कमवत आहेत. एका इन्स्टाग्राम चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या कोर्सविषयी माहिती दिली.

सॅलरी स्केलच्या पियुष मोंगा या इन्फ्लुअन्सरने एका जोडप्याला त्यांचं क्षेत्र आणि पगाराविषयी विचारलं. त्यावर त्या जोडप्याने उत्तर त्यांच्या क्षेत्राविषयी माहिती दिली. पती प्रोग्रामर असून पत्नी त्याला मदत करते. दोघेही वर्षाकाठी १.२ कोटी रुपये कमावतात.

कोणत्या क्षेत्रात आहे सर्वाधिक संधी

त्यांच्या क्षेत्राविषयी ते म्हणाले, तुम्ही टेक्निकल सर्टिफिकेशनसाठी अर्ज करू शकता. हाडूप सर्टिफिकेशन हा एक प्रकार आहे. तसंच, क्राऊड सर्टिफिकेशन आहे. तुम्हाला व्यवस्थापन क्षेत्रात जायचं असेल तर तुम्ही सीएसएम सर्टिफिकेशन (Certified ScrumMaster Certification) किंवा पीएमपी (Project Management Certification) शिकू शकता. पीएमपी खरंच मदत करते, असं पत्नीने सांगितलं.

पीएमपी सर्टिफिकेट्सला आता किंमत आहे का? असा प्रश्न मोंगाने या जोडप्याला विचारलं. कारण तीन वर्षांपूर्वी हा कोर्स करणं सोपं होतं. चांगल्या पगारासाठी क्लाउड सर्टिफिकेशन किती गरजेचं आहे? असंही या जोडप्याला विचारण्यात आलं.

“तुम्ही कोणत्या डोमेनेवर काम करताय यावर सगळं अवलंबून आहे. क्लाउड डोमेनमुळे नोकरी सहज मिळते. सायबर सिक्युरिटी सर्टिफिकेशनमध्येही जॉब लगेच मिळतो. आयटीमध्ये तुम्ही कोणत्या डोमेनवर काम करताय यावर तुमची नोकरी आणि पगार ठरतो”, असं या जोडप्याने सांगितलं.

हेही वाचा >> Success Story : वडिलांच्या निधनामुळे सोडलं आयएएस पद; ३० खाटा टाकून सुरू केली आरोग्य सेवा; वाचा अझीम यांची यशोगाथा

नेटकऱ्यांचं म्हणणं काय?

याच व्हिडिओच्या खाली काही नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत की, तुम्ही क्लाऊड सर्टिफिकेशन केलं असेल तर तुम्हाला नोकरी मिळणं अगदीच सोपं आहे. तर काहींनी म्हटलंय की सीएसएम दर दोन वर्षांनी अपडेट करण्याची गरज आहे. तर, पीएमपीला अशा अपडेशनची गरज लागत नाही. त्यामुळे पीएमपी हा सर्वांत चांगला पर्याय ठरू शकतो. तर काहींनी अशा सर्टिफिकेशनच्या माध्यमातून एवढा पगार मिळू शकत नाही, असं म्हटलंय. त्यामुळे करिअर काऊन्सिलचा सल्ला घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नका.