परदेशात उच्चशिक्षण घेणे, तिथेच चांगली नोकरी मिळवणे हे तिथे गेलेल्या अनेक तरुण तरूणींचे स्वप्न असते. पण या स्वप्नांची चौकट मोडून परदेशात स्व:तचे हटके स्थान निर्माण करणारी उपमा ही या सगळ्यांपेक्षा थोडी वेगळी आहे. व्यवसायाने वकिल असलेली उपमा ऑस्ट्रेलियात चहा विकते. कदाचित हे वाचून अनेकांच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या असतील पण या तरुणीने ऑस्ट्रेलियासारख्या देशात चहा विकण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. मूळची चंढीगडची असणारी उपमा विरदी ही २६ वर्षांची आहे. ऑस्ट्रेलियात तिने ‘चायवाली’ नावाचे हॉटेल उघडले आहे आणि गेल्या दोन वर्षांपासून तिला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. जिथे पेयांमध्ये कॉफी आणि मद्याला या देशात प्राधान्य अधिक आहे अशा ठिकाणी चहा त्यातूनही तो भारतीय पद्धतीचा विकणे थोडे अवघड होते. पण उपमाने हे करून दाखवले. तिला या नव्या व्यवसायासाठी २०१६ च्या ‘बिझनेस वुमन ऑफ द इअर’चा पुरस्कार देखील मिळाला आहे. उपमाचे आजोबा वैद्य होते. चहामध्ये कोणत्या औषधी वनस्पती टाकल्या तर आरोग्यास फायदेशीर ठरते हे तिला त्यांच्याकडून शिकायला मिळाले. आज ती ऑस्ट्रेलियात ‘चहावाली’ म्हणून प्रसिद्ध आहे. इतकेच नाही तर भारतीय पद्धतीने चहा कसा बनवायचा याची कार्यशाळाही ती घेते.
ऑस्ट्रेलियात ‘ही’ भारतीय चहावाली आहे प्रसिद्ध
'बिझनेस वुमन ऑफ द इअर'चा पुरस्कारही तिच्या नावे
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 02-11-2016 at 17:32 IST
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This indian origan woman from australia got bussiness woman of the year award