Viral Video : भारतात कला आणि कलाकारांची कमतरता नाही. सोशल मीडियावर एकापेक्षा एक उत्तम कलाकारांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके अचंबित करणारे असतात पाहून कोणीही थक्क होईल. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण डोळे झाकून फिरत्या चाकावर मातीचे भांडे साकारताना दिसत आहे. तरुणाची ही अनोखी कला पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक तरुण फिरत्या चाकावर मातीचे भांडे साकारताना दिसत आहे. त्याच्या पाठीमागे एक चिमुकला उभा असतो. चिमुकला हा या तरुणाच्या डोक्यावर बादली ठेवतो ज्यामुळे त्याचे डोळे झाकतात. पुढे व्हिडीओत तुम्हाला दिसेल की डोळे झाकून फिरत्या चाकावर हा तरुण मुलगा मातीचे भांडे साकारतो. तरुणाची ही उत्तम कला पाहून तुम्हीही त्याचे चाहते व्हाल.
हेही वाचा : कोल्हापूरी तडका! तरुणाने घेतला रांगडा कोल्हापूरी उखाणा, व्हिडीओ एकदा पाहाच
harishprajapati047 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान” तर एका युजरने लिहिलेय, “खूप सुंदर” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.