Viral Video : सोशल मीडियावर दर दिवशी अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होतात. काही व्हिडिओ मजेशीर असतात तर काही व्हिडिओ आश्चर्यचकित करणारे असतात. काही व्हिडिओ पाहून अंगावर काटा येतो तर काही व्हिडिओ डोळ्यात पाणी येतं. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आपला जीव धोक्यात टाकून एक व्यक्ती पुराच्या पाण्यातून कुत्र्याला वाचवताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. (this is a real humanity a man saved dogs life by risking his own life)
स्वतःचा जीव धोक्यात टाकून वाचवले कुत्र्याचे प्राण ( a man saved dog’s life)
“हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे” हे लोकप्रिय गीत तुम्ही ऐकले असेल. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला या गाण्याची आठवण येईल. व्हायरल व्हिडिओमध्ये एक नाला दिसेल. या नाल्यातून एक जेसीबी जाताना दिसत आहे. या जेसीबीच्या मदतीने एक व्यक्ती नाल्याच्या पाण्यात अडकलेल्या एका कुत्र्याला वाचवताना दिसते. व्हिडिओ तुम्हाला दिसेल ही व्यक्ती कुत्र्याला पकडते, जवळ घेते आणि या नाल्यातून बाहेर काढते. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल. सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे आणि या व्यक्तीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
कुत्रा आणि माणसाची मैत्री दाखवणारे अनेक व्हिडिओ तुम्ही आजवर पाहिले असेल. अनेकदा कुत्र्याने स्वतःचा जीव धोक्यात टाकून मालकाचे प्राण वाचवले आहेत. या व्हिडिओमध्ये मात्र एका व्यक्तीने स्वतःचा जीव धोक्यात टाकून कुत्र्याचा जीव वाचवला आहे.
पाहा व्हायरल व्हिडिओ
हेही वाचा : Natasa Stankovic Insta Post: ‘प्रेम म्हणजे…’, हार्दिकशी घटस्फोटानंतर नताशाची सूचक पोस्ट व्हायरल; प्रेम आणि नात्याबद्दलचा उल्लेख!
marathiasmitaofficial या इंस्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “सलाम या माणूसकीला”
या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, ” खूप छान” तर एका युजरने लिहिलेय, “एका युजरने लिहिलेय, “याला म्हणतात दयाळूपणा, खूप मोठं मन लागते धाडस करायला.या व्हिडिओ वर अनेक युर्जस नी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.