Viral Video : सामाजिक ऐक्य हे खूप महत्त्वाचे आहे. धर्म जातीचा विचार न करता एकत्र येऊन समाज कल्याणासाठी काम करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करून दाखवतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये बकऱ्या पुरात वाहून जाऊ नये म्हणून गावकऱ्यांनी साखळी करून बकऱ्यांचा जीव वाचवला आहेत. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. (The villagers saved goats lives by pulling them safely out of the flood waters viral video)
गावकऱ्यांनी साखळी करून बकऱ्यांचा वाचवला जीव (The villagers saved goats’ lives )
असं म्हणतात, माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म असतो. या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला या गावकऱ्यांची माणुसकी दिसून येईल. या व्हायरल व्हिडिओमध्ये बकऱ्या पुराच्या पाण्यात वाहून जाऊ नये म्हणून गावकऱ्यांनी पुराच्या पाण्यात उभे राहून साखळी तयार केली आहे आणि बकऱ्यांना एक एक करून एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढले आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
hari_anchra_jhunjharpura या इंस्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “हा व्हिडिओ राजस्थान येथील सिरोहीच्या मीरपुर गावातील आहे . मीरपुर नदीच्या पाण्याची पातळी जास्त असल्याने बकऱ्या वाहून जाण्याची भीती होती पण तेथील देवाशी समाजाच्या लोकांनी साखळी तयार करून एक एक बकरी पुराच्या पाण्यातून बाहेर काढले.”
हेही वाचा : “मला फसवलं जातय…” अपघाताच्या Viral Video वर रजत दलालने पहिल्यांदाच सोडलं मौन, म्हणाला, “माझ्याविरोधात कट…”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “जरी हे शहरात घ़डले असते तर लोक उभे राहून बघत राहिले असते” तर एका युजरने लिहिलेय, “हे राजस्थान आहे इथे एकता आहे. आणखी काही युजर्सनी लिहिलेय, “हे गाव आहे गाव,शहर नाही” एक युजर लिहितो, “हे गाव आहे जिथे आपलेपण आहे.” व्हिडिओवर अनेक युजर्सनी हार्टची इमोजी शेअर केले आहेत. तर काही युजर्सनी गावकऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.