Viral Video : लहान मुलांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी हे लहान मुले मजा मस्ती करताना दिसतात तर कधी डान्स करताना दिसतात. पालक त्यांच्या मुलांच्या अनेक क्लिप्स सोशल मीडियावर आवडीने शेअर करतात. एका पालकाने असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. संस्कार म्हणजे काय, हे तुम्हाला कळेल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लहानपणीच संस्कार बालमनावर रुजवायला हवेत, यासाठी पालक नेहमी प्रयत्न करतात. मुलांना योग्य वळण लागावे, अशी त्यांची इच्छा असते. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटेल की चिमुकल्यावर त्याच्या आईवडिलांनी खूप चांगले संस्कार केले आहेत.

हेही वाचा : प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला! विदर्भ एक्स्प्रेसच्या चाकाखाली डोकं जाणार इतक्यात…नाशिकमधला थरारक VIDEO समोर

चिमुकल्याला खायला ब्रेड दिला पण त्याने पहिला घास कुत्र्याला भरवला

या व्हायरल व्हिडीओमध्ये तु्म्हाला दिसेल की कोणीतरी घरची व्यक्ती (कॅमेऱ्यात दिसत नाही) चिमुकल्याला खायला ब्रेड देते पण चिमुकला ते ब्रेड खात नाही आणि हातात ब्रेड घेऊन घराबाहेर जाताना दिसतो. तेव्हा वडील विचारतात, “कुठे जातोय?” त्यावर चिमुकला काहीही प्रतिक्रिया न देता दरवाज्यात जातो आणि बाहेर उभा असलेल्या कुत्र्‍याला ब्रेड खाऊ घालतो. चिमुकल्याचे हे कृत्य पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. चिमुकल्याची कुत्र्याविषयीची दया पाहून कोणीही थक्क होईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “हे पेरावं लागतं. स्वत: खाण्यापूर्वी शिवबाने आधी सुशीला खाऊ घातले”

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : भररस्त्यात प्रपोज करताच मुलगी पळाली अन् तरुणाला ढसा ढसा रडला, शेवटी लोकांनी दिला धीर; पाहा VIDEO

gauravmvartak या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “नावातच त्याच्या जादु आहे त्याच्या, संस्कार तर आपोआप येणारच” तर एका युजरने लिहिलेय, “नावातच शिवबा असणं त्याला तोड कशी असणार दादा, संस्कार जिजाऊन सारखे” आणखी एका युजरने लिहिलेय, “हे शिक्षण खूप गरजेचे आहे.. संस्कार असेच रुजवावे लागतात” एक युजर लिहितो, “बाळा तुला खुप खुप आशिर्वाद मिळतील त्या मुक्या जीवाचे….” अनेक युजर्सना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. काही युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This is a real sanskar a child feeding bread to a pet dog before himself video goes viral ndj
Show comments