Viral Video : सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकली क्रिकेट खेळताना दिसत आहे. फक्त तीन वर्षाची ही चिमुकली तुफान बॅटिंग करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
चिमुकल्यांना तुम्ही कधी मस्ती करताना पाहिले असेल तर कधी डान्स करताना पाहिले असेल, कधी रडताना पाहिले असेल तर कधी हसताना पाहिले असेल. पण तुम्ही कधी चिमुकल्यांना तुफान बॅटिंग करताना पाहिले आहे का? हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
हेही वाचा : “…इत्ता सा टुकडा चाँद का”; चिमुकलीच्या चेहऱ्यावरील हावभाव अन् डान्स स्टेप्स पाहाच, डान्स व्हिडीओ व्हायरल
व्हायरल व्हिडीओ
हा व्हायरल व्हिडीओ एका मैदानावरील आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकली क्रिकेट खेळताना दिसत आहे. तिच्या हातात बॅट आहे आणि ती तुफान बॅटिंग करताना दिसत आहे. चिमुकलीचा हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. ही चिमुकली क्रिकेटची प्रॅक्टिस करत आहे. ती बॅटिंग शिकण्याचा प्रयत्न करत आहे पण एवढ्या कमी वयात ती इतकी सुंदर बॅटिंग करते, हे पाहून तुम्हालाही वाटेल की ही चिमुकली भविष्यात चांगली क्रिकेटर होईल.
baburam.choudhary.526 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “येणाऱ्या काळात भारतीय टीममध्ये दिसेन.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान मुली.. अशीच खेळत राहा, खूप पुढे जाशील.” तर एका युजरने लिहिलेय, “या मुलीसह मला त्या आईवडिलांचे कौतुक करावेसे वाटते की ज्यांनी त्यांच्या मुलीला या वयात काहीतरी चांगले शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. खूप आशीर्वाद मुली.. अशीच आयुष्यात पुढे जा आणि यशस्वी हो. आई वडिलांचे नाव मोठे कर” आणखी एका युजरने लिहिलेय, “या चिमुकलीला इंटरनॅशनल ट्रेनिंग सेंटरमध्ये पाठवा. १००० टक्के ही मुलगी नाव कमवणार”