Narayana Murthy : इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती हे उद्योग क्षेत्रातील नावाजलेलं नाव आहे. लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत सर्वांसाठी
नारायण मूर्ती प्रेरणास्थान आहे. कठीण परिस्थितीतून मार्ग काढत त्यांनी जीवनात मोठे यश मिळवले. तुम्हाला माहितीच असेल की नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांची लेक अक्षता मूर्ती ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांची पत्नी आहे. सध्या नारायण मूर्ती आणि त्यांच्या लेकीचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा फोटो एका आईस्क्रीम पार्लरमधील आहे.

बंगळूरूच्या एका आईस्क्रीम पार्लरमध्ये जाऊन नारायण मूर्तींनी लेकीसह आईस्क्रीम खाण्याचा आनंद घेतला आहे. सध्या हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. ब्रिटिश पंतप्रधानांची पत्नी अक्षता मूर्ती सुनक आणि देशातील आयटी किंग म्हणून ओळखले नारायण मूर्ती एखाद्या आईस्क्रीम पार्लरमध्ये जाऊन आईस्क्रीम खाताना दिसतील, ही कल्पना आजवर कोणी केली नसेल पण हा फोटो तुम्हीही थक्क व्हाल. हा फोटो पाहून अनेक जणांनी त्यांच्या साधेपणाचे कौतुक केले आहे.

Meghna Girish या एक्स अकाउंटवरून मेघना गिरीष यांनी नारायण मूर्ती आणि अक्षता मूर्ती यांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “बंगळूरू, जयनगर कॉर्नरहाऊस.. येथील भयंकर गर्दी होती. ते शांतपणे आले आणि त्यांनी आईस्क्रीम विकत घेतली. सुदैवाने एका कर्मचाऱ्याने त्यांना ओळखले आणि त्यांना बसायला खूर्च्या दिल्या. आमच्या आवडत्या आईस्क्रीमला युकेच्या पहिल्या महिला आणि तिचे वडील भारताचे आयटी किंग यांच्याकडून विनामूल्य मान्यता मिळाल्याचे पाहून आनंद झाला. कॉर्नरहाऊस नेहमी उत्तम आहे. बंगळूरूला आला तर नक्की खा”

हेही वाचा : “…रावांनी मला पावडर लावून फसवलं…” महिलेने घेतला भन्नाट उखाणा, VIDEO पाहून पोट धरून हसाल

या फोटोमध्ये तुम्हाला दिसेल की नारायण मूर्ती आणि त्यांची लेक सामान्य माणसांप्रमाणे आईस्क्रीम खाण्याचा आनंद घेत आहे. त्यांच्यातला हाच साधेपणा अनेकदा सर्वांना आवडतो. या फोटोवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान. साधी माणसे” तर एका युजरने लिहिलेय, “याला म्हणतात साधेपणा! ” आणखी एका युजरने लिहिलेय, “साधेपणा हे मूर्तींचे वैशिष्ट्य आहे” अनेक युजर्सनी नारायण मूर्ती यांचा हा साधेपणा आवडला आहे. अनेकांनी या फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Story img Loader