Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेक जण व्हिडीओच्या माध्यमातून आपली कला सादर करत असतात. सध्या अशाच एका तरुणाचा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये तरुणाने भर रस्त्यावर अप्रतिम डान्स केला आहे. त्याचा डान्स पाहून तु्म्हीही त्याचे चाहते व्हाल.
भारतात कला आणि कलाकारांची काहीही कमतरता नाही. अनेक जण आवडीने रस्त्यावर कला सादर करतात. रस्त्यावरचे हे कलाकार रस्त्यावर कला सादर करुन पैसे कमवतात. तुम्ही अनेकदा असे कलाकार बघितले असेल. असाच हा तरुण रस्त्यावर भन्नाट डान्स करताना दिसतोय. त्याचा डान्स कोणालाही आवडेल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक तरुण खूप सुंदर डान्स करताना दिसत आहे. थंडीचे दिवस असल्यामुळे त्याने अंगावर स्वेटर घातले आहेत. तो इतका सुंदर डान्स करतोय की तुम्हाला हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा बघावासा वाटू शकतो.त्याच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील स्मित हास्य पाहून तुम्हीही थक्क व्हाल. हा व्हिडीओ नवी दिल्ली येथील एका रस्त्यावरील आहे. व्हिडीओवर या ठिकाणाचे नाव लिहिलेय.
हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे पण त्याच बरोबर एवढ्या उमद्या कलाकाराला बघण्यासाठी गर्दी दिसत नसल्यामुळे नाराजी सुद्धा व्यक्त केली आहे. एका युजरने लिहिलेय, “खूप सुंदर” तर एका युजरने लिहिलेय, “याला म्हणतात खरी कला” आणखी एका युजरने लिहिलेय, “हा तरुण कलाकार खूप टॅलेंटेड आहे पण त्याला सहकार्य आणि चांगल्या प्लॅटफॉर्मची गरज आहे.”

school students couple dance so gracefully on marathi song
“माझं काळीज लागलंय नाचु न गानं वाजू दया” जिल्हा परिषद शाळेत चिमुकल्यांनी जोडीने केला भन्नाट डान्स; VIDEO होतोय व्हायरल
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Maharashtrachi Hasyajatra Fame shivali Parab dance on uyi amma song
Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा Uyi Amma गाण्यावर भन्नाट डान्स, नेटकरी कौतुक करत म्हणाले…
video of a young girl dance on 26 January
Video : “अशा शाळांवर कारवाई केली पाहिजे” २६ जानेवारीला तरुणीने सादर केलेला डान्स पाहून नेटकरी संतापले
Video of a little child presents amazing lavani dance in a school program
Video : काय भारी नाचतोय राव! जि.प. शाळेत चिमुकल्याने सादर केली अप्रतिम लावणी; नेटकरी म्हणाले, “याच्यासमोर सर्व लावणी सम्राज्ञी फिक्या..”
Mumbai local video of some girls dancing on a marathi song
‘तुमच्या पुढ्यात कुटते मी ज्वानीचा मसाला’ गाण्यावर मुंबई लोकलमध्ये तरुणींचा भन्नाट डान्स; लाखो लोकांनी पाहिलेला VIDEO तुम्ही पाहिला का?
gilr dance
“ऐका दाजीबा….!”, मराठमोळ्या गाण्यावर चिमुकलीचा भन्नाट डान्स, Viral Video पाहून तुम्हीही व्हाल तिचे चाहते
Mother daughter amazing duo did an amazing dance on the Koli song Video viral
“तो चक चक सोन्याचा…”; माय-लेकीची भन्नाट जोडी, कोळी गीतावर केले अफलातून नृत्य! Video पाहून सांगा, कोणी मारली बाजी?

हेही वाचा : Optical Illusion : दिसतं तसं नसतं! तुम्हाला या फोटोमध्ये काही दिसतंय का? नीट पाहा, अचंबित करणारा फोटो व्हायरल

gautam_paswan10 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कला”. हे अकाउंट या तरुणाचे असून या तरुणाचे नाव गौतम पासवान आहे. तो एक उत्तम डान्सर असून रस्त्यावर किंवा सार्वजानिक ठिकाणी डान्स सादर करतो. त्याच्या या अकाउंटवरुन त्याने अनेक डान्सचे व्हिडीओ शेअर केले आहेत. युजर्सनी त्याच्या प्रत्येक व्हिडीओ वर भरभरून प्रतिसाद दिला आहे.

Story img Loader