Taxi Borad : एका टॅक्सी चालकाने त्याच्या टॅक्सीमध्ये लावलेली पाटी ( Taxi Borad ) सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. टॅक्सीमध्ये रोमान्स करणाऱ्या किंवा प्रेम करणाऱ्या जोडप्यांना, प्रेमी युगुलांना उद्देशून या टॅक्सी ड्रायव्हरने ही पाटी ( Taxi Borad ) लावली आहे जी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. तसंच टॅक्सीत बसणाऱ्या जोडप्यांनी सुरक्षित अंतर ठेवा असंही या टॅक्सी चालकाने म्हटलं आहे. टॅक्सीमध्ये किंवा रिक्षामध्ये रोमान्स करणारी कपल्स देशभरातल्या विविध शहरांमध्ये काही कमी नाहीत. या सगळ्यांना आळा घालण्याच्या उद्देशाने टॅक्सी चालकाने ही खास नोट लिहिली आहे. काही दिवसांपूर्वी सहा नियम असलेली एक नोट टॅक्सी चालकाने लावली होती. ती देखील चांगलीच व्हायरल झाली होती. त्यापाठोपाठ आता प्रेमी युगुलांसाठी या टॅक्सी चालकाने एक खास पाटी ( Taxi Borad ) लावली आहे. त्या पाटीचा ( Taxi Borad ) फोटो व्हायरल झाला आहे.
काय आहे टॅक्सी चालकाने लावलेली पाटी?
हैदराबाद येथील टॅक्सी चालकाने टॅक्सीत प्रेम करणाऱ्या जोडप्यांना उद्देशून एक पाटी ( Taxi Borad ) लिहिली आहे. त्याने यात जोडप्यांना थेट इशारा दिला आहे. एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवून टॅक्सीत बसा. तसंच मी तुम्हाला वॉर्निंग देतोय, ही टॅक्सी आहे. तुमची खासगी जागा किंवा ओयो रुम नाही. टॅक्सीत एकमेकांपासून लांब बसा आणि अंतर राखा एक्स या मायक्रोब्लॉगिंग साईटवर हा फोटो व्हायरल झाला आहे.
व्हायरल पोस्टवर सोशल मीडिया युजर्स काय म्हणाले?
एक युजर म्हणाला टॅक्सी चालकाने अत्यंत योग्य संदेश दिला आणि योग्य सूचना केली आहे. तर दुसरा युजर म्हणाला अरेरे हे दिल्ली आणि बंगळुरुत पाहिलं होतं आता हैदराबादमध्येही हेच वाचतो आहे. मागच्याच आठवड्यात बंगळुरु येथील चालकाने त्याच्या टॅक्सीत काही सूचना लिहिल्या होत्या. त्यासंबंधीचा मेसेजही व्हायरल झाला होता.
त्या टॅक्सी चालकाने काय लिहिलं होतं?
तुम्ही माझ्या टॅक्सीचे मालक नाही
जो चालक टॅक्सी चालवतो आहे तो मालक आहे.
चालकाशी नीट बोला, आदर राखा आणि आदर मिळवा
तुमचा स्वभाव तुमच्या खिशात ठेवा, तो आम्हाला दाखवण्याची गरज नाही. कारण तुम्ही आम्हाला त्याचे जास्त पैसे देत नाही.
आम्हाला भय्या या नावाने हाक मारु नका.
सर्वात महत्त्वाचे- आम्हाला टॅक्सी जलद गतीने चालवण्यास सांगू नका, घरातून वेळेवर निघा.
या सूचना बंगळुरुच्या टॅक्सी चालकाने लिहिल्या होत्या. त्या सूचनेपाठोपाठ आता ही टॅक्सी आहे रोमान्स करण्याची जागा किंवा ओयो रुम नाही हे लिहिलेली नोट व्हायरल होते आहे.