कुत्रा माणसाचा सर्वात चांगला मित्र आहे. ते सगळीकडे तुमच्या मागे मागे येतात, तुमचं अनुसरण करतात. माणसाने कुत्र्यांसोबत शेअर केलेल्या सुंदर बंधनाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर वारंवार व्हायरल होतचं असतात. अशातच आता अजून एक फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. एका माणसाने सायकलवर त्याच्या कुत्र्याला घेऊन जातानाचा हा फोटो आहे. पण यात वेगळेपण म्हणजे त्याने आपल्या लाडक्या कुत्र्याला घेऊन जाण्यासाठी, त्याच्यासोबत प्रवास करण्यासाठी देसी जुगाड वापरल्याचं या फोटोतून दिसून येत आहे.
काय आहे हा देसी जुगाड?
फोटोंमध्ये निळा शर्ट घातलेला एक माणूस तामिळनाडूच्या रस्त्यावर सायकल चालवताना दिसत आहे. या फोटोत तुमचे लक्ष वेधून घेईल ते म्हणजे त्या माणसाच्या मागे बसलेलाकुत्रा. कुत्रा निळ्या खुर्चीवर बसलेला आहे ज्याचा वापर मुले करतात. ती खुर्ची सायकलला दोरीने बांधली आहे. आणि त्यावर कुत्र्याला बसवलं आहे. खुर्चीवर बसून प्रवास करताना कुत्राही आजूबाजूला बघत प्रवासाची मज्जा घेताना दिसत आहे.
नेटीझन्सच्या प्रतिक्रिया
ट्विटरवर व्हायरल झालेल्या फोटोला आत्तापर्यंत २१,००० हजाराहून अधिक लाइक्स आणि २५०० हून अधिक रीट्विट मिळाले आहेत. नेटिझन्सना माणसाच्या करुणेचा हावभाव आवडला. काहींना भीती वाटली की कुत्रा खुर्चीवरून घसरू शकतो. एक वापरकर्ता म्हणाला, “जुगाड, सर्व योग्य कारणांसाठी.” दुसऱ्याने लिहिले, “स्वप्न जगणे. कुत्रा आणि माणूस.” तिसऱ्या वापरकर्त्याने पोस्ट केले, “खूप मोहक. तुम्हाला करुणा दाखवण्यासाठी प्रत्येक वेळी श्रीमंत होण्याची गरज नाही.”
या आठवड्याच्या सुरुवातीला, रतन टाटा यांनी एका ताजमहाल पॅलेसच्या कर्मचाऱ्याचा एक सुंदर फोटो पोस्ट केला होता. त्या कर्मचाऱ्याने मुसळधार पावसात आपली छत्री कुत्र्यासोबत शेअर केली होती. जोरदार मुसळधार पडत असताना. मुंबईच्या व्यस्त गर्दीत टिपलेला एक हृदयस्पर्शी क्षण होता.
तुम्हाला कसा वाटला हा फोटो?