सिंह आणि कुत्र्याच्या भांडणाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सिंह कुत्र्याच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका व्यक्तीने लिहिले की हे खरोखर आश्चर्यकारक आहे. एका व्यक्तीने कमेंट केली की हा रस्ता नक्कीच कुत्र्याचा असेल कारण त्याच्या गल्लीतील प्रत्येक कुत्रा सिंह आहे. इन्स्टा आणि व्हॉट्सअॅपवरही लोक हा व्हिडीओ प्रचंड शेअर करत आहेत.
आता जर तुम्हाला कोणी सांगितलं की कुत्राही सिंहावर हल्ला करू शकतो किंवा खरंच प्रत्येक कुत्र्याचा दिवस येतो, तर तुम्हाला त्यावर विश्वास ठेवणे सोपे जाईल.
व्हायरल झालेला हा व्हिडीओ खरोखरच अप्रतिम आहे. कुत्रा एक सेकंदही उभा राहत नाही आणि सिंहाला पळूवून लावतो. सफारीमध्ये हा व्हिडीओ कैद करण्यात आला आहे. व्हिडीओ IFS अधिकारी सुसंता नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये त्याने आपल्या फॉलोअर्सना विचारले की, शेवटी काय होत आहे?
( हे ही वाचा: T20 WC: पराभवानंतर भारतीय चाहत्याने दिलेल्या उत्तराने काढली पाकिस्तानी चाहत्याची विकेट; पहा व्हिडीओ )
( हे ही वाचा: कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचे निधन; शेकडो चाहते रस्त्यावर जमा! )
हे अधिकारी वन्य प्राण्यांचे असे आश्चर्यकारक व्हिडीओ शेअर करत असतात. त्यांनी शेअर केलेले व्हिडीओ लोकांना खूप आवडतात. या व्हिडीओलाही नेटीझन्सने पसंती दर्शवली आहे.सिंह आणि कुत्र्याच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका व्यक्तीने लिहिले की हे खरोखर आश्चर्यकारक आहे.