Viral Video : नवरा बायकोचे नाते हे जगावेगळे असते. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा अन् आपुलकी दिसून येते. दोन व्यक्ती एकत्र येतात अन् नव्या आयुष्याची सुरूवात करतात. आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचे वचन देतात. संसारात रमल्यानंतर अनेकदा त्यांना एकमेकांविषयी व्यक्त करता येत नाही पण छोट्या मोठ्या कृतीतून त्यांचे जोडीदाराविषयीचे प्रेम दिसून येते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ महाकुंभ मेळ्यातील आहे. या व्हिडीओमध्ये नवरा त्याच्या पत्नीसाठी असं काही करतो, की पाहून कोणीही थक्क होईल. नेमका तो काय करतो, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल. (this is called husband love a man holding mirror for a wife while doing makeup in mahakumbh mela true love video goes viral)

बायकोला मेकअप करताना त्रास होऊ नये म्हणून…

हा व्हायरल व्हिडीओ महाकुंभ मेळ्यातील आहे. व्हिडीओत तुम्हाला लोकांचा भयंकर गर्दी दिसून येईल. त्यात एका जोडप्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की पत्नी मेकअप करत आहे तर तिचा पती तिला नीट मेकअप करता यावा, यासाठी तिच्यासमोर आरसा हातात घेऊन उभा आहे. व्हिडीओ तुम्हाला दिसेल की या आरशामध्ये बघून पत्नी मेकअप करत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही म्हणेल, नवरा असावा तर असा.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

saundarya_shukla या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “एका हातात मेकअप पाऊच आणि दुसऱ्या हातात आरसा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “पुरुष प्रेमात पडणे, ही पृथ्वीवरील सर्वात सुंदर गोष्ट आहे” तर एका युजरने लिहिलेय, “मला पण असा नवरा दे” आणखी एका युजरने लिहिलेय, “एवढ्या गर्दीत मेकअप करायला टॅलेंट लागतं राव” एक युजर लिहितो, “किती गोड जोडपं आहे” तर एक युजर लिहितो, “जेव्हा पुरुष एका स्त्रीच्या प्रेमात असतो”

Story img Loader