अनेक वेळा आपण रद्दीत पडलेल्या वस्तूंना फारसे महत्त्व देत नाही, पण जेव्हा त्याचा उपयोग होतो, तेव्हा ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटते. जे लोक हस्तकलेमध्ये रस घेतात त्यांच्याकडे रद्दीत पडलेल्या गोष्टी नव्याने तयार करण्याचे कौशल्य असते. देसी जुगाडच्या मदतीने एका व्यक्तीने झाडावरील फळे तोडण्यासाठी एक कॅचर बनवला, ज्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटले आहे. इतकेच नाही, तर उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही व्हिडीओ शेअर करून त्यांचे जोरदार कौतुक केले.
उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी झाडांवरून फळे तोडण्यासाठी साध्या घरगुती देशी जुगाडचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केलेला व्हिडीओ ४ लाखांहून जास्त वेळा पाहिला गेला आहे. आनंद महिंद्रा या शोधकर्त्याच्या आउट-ऑफ-द-बॉक्स विचाराने खूप प्रभावित झाले. व्हिडीओमध्ये एक वृद्ध व्यक्ती लांबलचक काठी वापरताना दिसत आहे, ज्याच्या शेवटी प्लास्टिकची बाटली आहे. या काठीच्या मदतीने ने झाडावरची फळे तोडण्याचा प्रयत्न करत आहे. ही बाटली मागील बाजूस चार भागांमध्ये उघडते आणि नंतर फळे बाटलीत पडल्यावर बंद होते.
‘मुंबईकर + सुरक्षा = आनंदी जीवन!’; मुंबई पोलिसांचा हटके रील तुम्ही पाहिला का?
त्या व्यक्तीने ते कसे बनवले हे देखील व्हिडीओमध्ये पाहिले जाऊ शकते. आनंद महिंद्रा यांनी व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय, ‘हा फार मोठा शोध नाही, पण यामुळे मी उत्साहित झालो आहे. कारण हा छोटासा आविष्कार आपली संस्कृती दर्शवतो. आपल्या बेसमेंट-गॅरेज वर्कशॉपमध्ये प्रयोग करण्याच्या सवयीमुळे अमेरिका शोधाचे पॉवरहाऊस बनले. असे छोटे शोधक देखील टायटन्स बनू शकतात.’ या व्हिडीओला सोशल मीडियावर खूप पसंती दिली जात आहे. या व्हिडीओमधील व्यक्तीने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.