प्राण्यांसोबत केले जाणारे गैरवापर कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतलं जाऊ नये. एखाद्या प्राण्यावर अत्याचार होत असेल, त्याला चुकीच्या पद्धतीने हाताळले जात असेल किंवा मनोरंजन व्हिडीओ बनवण्यसाठी त्याला त्रास दिला जात असेल तर अशा परिस्थितीत हस्तक्षेप करणे महत्त्वाचे आहे. दुर्दैवाने, मानवी हस्तक्षेप नेहमीच शक्य नसतो. परंतु निसर्गाचा स्वतःचा मार्ग आहे ज्याची शक्यता नसलेल्या ठिकाणी बचावकर्त्यांना पाठवते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की काय आहे व्हायरल व्हिडीओमध्ये?

एका पाळीव कुत्र्याचा छळ करणाऱ्या माणसाचे त्रासदायक फुटेज भारतीय वन सेवा अधिकारी सुसंता नंदा यांनी अलीकडेच शेअर केले होते. क्लिपची पहिली काही मिनिटे पाहणे कठीण आहे कारण त्यात माणूस कुत्र्याला त्याच्या मानेला धरून वरती ओढतो. तेव्हा कुत्रा वेदनेने ओरडतो. पण हा व्हिडीओ अनपेक्षित वळणाने संपतो.

चेकर्ड शर्ट आणि पायघोळ पॅन्ट घातलेला माणूस कुत्र्याला त्रास देत असताना, एक गाय घटनास्थळी आली आणि तिने कुत्र्याला दूर ढकलून दिलं. त्यानंतर पूर्ण ताकदीने त्या माणसाला खाली पाडले. व्हिडीओ संपण्यापूर्वी गायीने त्या माणसाला मारले आणि काही सेकंदांसाठी त्याला जमिनीवर ढकलले.

नेटीझन्सची प्रतक्रिया

‘कर्म’ या कॅप्शनसह नंदा यांनी रविवारी ट्विटरवर व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओला आत्तापर्यंत २२५.७ हजाराहून जास्त लोकांनी बघितलं आहे. अनेकांनी यावर कमेंट्सही केल्या आहेत. अनेक वापरकर्त्यांनी व्हिडीओमधील माणसावर आणि कुत्र्याला मदत न करता संपूर्ण सीन रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीवर टीका केली. एका वापरकर्त्याने लिहिले, “माणूस रेकॉर्डिंगमध्ये व्यस्त होता, एका प्राण्याने दुसऱ्या प्राण्याला समजले आणि मदत केली. “

( हे ही वाचा: पाककडून हारल्यानंतर तुम्ही TV फोडला का? विचारणाऱ्याला आकाश चोप्राचं भन्नाट उत्तर, “मित्रा, आमच्याकडे…”)

“सर, कुत्र्याचा छळ करणार्‍या माणसाला गाय मारत आहे, हे सिद्ध करते की गायी देखील वाईट मानवांना सहन करू शकत नाहीत आणि त्वरित न्याय देण्यावर विश्वास ठेवू शकते आणि त्यांच्या उपयुक्ततेसाठी आणि सहानुभूतीपूर्ण स्वभावामुळे ती गाय नक्कीच आपल्या आदरास पात्र आहे” अशी कमेंट एकाने केली.

“वेदनेत असूनही ती त्याला दुखावत नाही. प्राण्याने दाखवलेल्या दयाळूपणाची, आपल्या माणसांमध्ये कमतरता आहे.” अशी दुसऱ्याने कमेंट केली. तिसऱ्या वापरकर्त्याने कमेंट केली की “कर्म नव्हे तर चुकीच्या विरोधात आवाज उठवण्याची आणि कारवाई करण्याची भावना, जे सामान्यतः करत नाही. आजकाल माणसांमध्येही हे दिसत नाही” असं चौथ्या वापरकर्त्याने लिहिले.