Viral Video : सोशल मीडियावर दरदिवशी अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. अनेक जण त्यांच्या आजुबाजूला घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टी गोष्टी सुद्धा कॅमेऱ्यात कैद करून सोशल मिडियावर शेअर करतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणाचा एका माणसाबरोबर संवाद दाखवला आहे. या व्हिडीओत हा माणूस या तरुणाला सांगतो की तो रॅपिडो आणि युबरसाठी दुचाकी चालवत दर महिन्याला ८० हजाराच्या वर कमावतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (this is called real hard work UBER and Rapido bike drivers earn 80 thousand rupees per month)
UBER अन् Rapido दुचाकीचालक महिन्याला कमावतो ८० हजार रूपये
या व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण एका माणसाबरोबर संवाद साधताना दिसत आहे. हा माणूस दुचाकीवर बसलेला आहे.
तरुण- तुम्ही किती कमावता?
माणूस – ८० हजार रुपये. प्रत्येक महिन्याच्या ८०-८५ हजार रुपये
तरुण- फक्त रॅपिडो चालवून?
माणूस- युबरमध्ये सुद्धा, १३ तास काम करून. बोलेल तर लोक हसणार. आम्हाला खूप पैसा मिळतो माहितीये का?
तरुण- आम्ही सुद्धा एवढं कमावत नाही. तुम्ही स्वत:च्या इच्छेने करत आहात
माणूस- हो.. स्वत:च्या इच्छेने करतोय. मला कोणी बोलणारा नाही. मला जेव्हा वाटेल तेव्हा जाऊन झोपणार.
तरुण- छान भावा.. तुमच्याशी बोलून छान वाटले.
हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
Karnataka Portfolio या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “सर तुमच्याप्रती आदर आहे. रस्त्यावर वाहन चालवू दिवसाचे 13 तास कठीण परिश्रम करणे सोपे नाही.” तर एका युजरने लिहिलेय, “त्याच्या मेहनतीचे त्याला फळ मिळत आहे. खूप मोठा सलाम” आणखी एका युजरने लिहिलेय, “दररोज १३ तास काम करणे एवढं सोप्पं नाही” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूप प्रेरणा देणारा व्हिडीओ आहे.”