इन्फोसिसचे माजी वित्तीय अधिकारी आणि दिग्गज गुंतवणूकदार टी. व्ही. मोहनदास पै यांनी काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांच्यावर निशाणा साधला आहे. शशी थरुर यांनी शेअर केलेल्या एका फोटोवर पै हे चांगलेच संतापले आहेत. इंधन दरवाढीविरोधात टोला लगावताना थरुर यांनी एक कार्टून शेअर केलं आहे. मात्र यावर पै यांनी आक्षेप नोंदवत थरुर यांच्याकडून आम्हाला अशी अपेक्षा नाहीय असं म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही खूपच खालच्या दर्जाचा टीका आहे. आम्हाला वाटलेलं की तुमचा दर्जा बराच चांगला आहे. मात्र तुम्ही हे असं ट्वीट करुन इतर नागरिकांना तुमच्या सडलेल्या मानसिकतेची झलक दाखवली. हे ट्विट मजेदार नक्कीच नाहीय, असं ट्विट पै यांनी केलं आहे.

थरुर यांनी काय ट्विट केलं आहे?

शशी थरुर यांनी भाजपा सत्तेत असते तेव्हा प्रत्येक दिवस हा राष्ट्रीय योग दिन असतो, अशा कॅफ्शनसहीत एक फोटो शेअर केलाय. हा फोटो जगप्रसिद्ध सिम्पसन्स या कार्टून मालिकेतील आहे. फोटोमध्ये एकजण गुडघे जमीनीवर ठेऊन योगासने करण्याच्या तयारीत दिसत आहे. त्यावर दुसरा तिला ही कोणती पोझिशन आहे असं विचारतो. त्यावर ती इंडियन टॅक्सपेअर म्हणजेच भारतीय करदाता असं उत्तर देते.

या फोटोमधून दोन अर्थ निघत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच हा फोटो म्हणजे अश्लील पद्धतीने केलेली टीका आहे असं अप्रत्यक्षरित्या म्हणत पै यांनी थरुर यांच्यावर निशाणा साधला आहे. पै यांनी आपल्या ट्विटमध्ये अनेक मान्यवरांनाही टॅग केलं आहे. यामध्ये आनंद महिंद्रा यांचाही समावेश आहे.