लोक कशा-कशासोबत सेल्फी घेतील याचा काही नेम नाही. पुतळे तर सोडून द्या अगदी गोठ्यात बांधलेल्या गुरांना देखील सेल्फी वेड्यांनी सोडले नाही. अशा महाभागांचे सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल होतात. व्हायरल तर सोडाच पण त्यांच्यावर विनोद करून त्यांचे हसे होते ते वेगळेच. हा सेल्फी म्हणजे याचे उत्तम उदाहरण आहे. या सेल्फीमध्ये दिसणारे महान व्यक्तीमत्त्व नेमके कोण हे कळले नसले तरी सोशल मीडियावर मात्र त्यांची चांगलीच खिल्ली उडवली जात आहे.  हेल्मेट घातले नाही म्हणून पोलिसांनी या दोन्ही दुचाकीस्वारांवर कारवाई केली. पण पोलिसांचे लक्ष नसताना हे दोघेही सेल्फी घेण्यात व्यस्त आहे. पोलीस अधिकारी दंडाची पावती फाडण्यात व्यस्त आहेत. तेव्हा हे दोघेही पोलिसांची नजर चुकवून त्यांच्यासोबत सेल्फी घेत आहेत. वेळ काय, प्रसंग काय याचे कोणतेही भान या दोघांनाही नाही त्यामुळे या दोघांना ‘सेल्फी ऑफ द इअर’चा पुरस्कारच द्या अशा टीका सोशल मीडियावर होत आहे. अशा प्रकारे सेल्फी काढणारे हे काही पहिलेच नाहीत.

पॅरिस हल्ल्याच्यावेळी काही नागरिकांना दहशतवाद्यांनी ओलिस ठेवले होते. अशा परिस्थितीतही ओलिसांपैकी एका तरूणीने देखील सेल्फी काढून तो सोशल मीडियावर अपलोड केला होता. तेव्हा तिच्यावरही जगभरातून खूप टिका झाली होती. काही महिन्यांपूर्वी एका तरूणाने चक्क आपल्या मृत काकांच्या प्रेताशेजारी बसून सेल्फी काढला होता. आपल्या काकाचे निधन झाले आहे अशी ओळ लिहून त्याने तो सोशल मीडियावर टाकला होता, त्यानंतर त्याच्या असंवेदनशील वागण्यावर टीकेची झोड उठली होती.

Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
tiger attack on cow
VIDEO: शिकार करो या शिकार बनो! ताडोबामध्ये वाघानं पर्यटकांसमोरच केला गायीवर हल्ला; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
small girls in the street
‘मोठा मॅटर झाला…’ गल्लीतल्या दोन मुलींचं झालं भांडण; एकमेकींना धमकी देत असं काही म्हणाल्या… VIDEO पाहून हसाल पोट धरून
Mumbai railway platform Thief got caught stealing wallet inside shocking video goes viral
मुंबईकरांनो चोरी करण्याची ‘ही’ पद्धत पाहा आणि सावध व्हा; रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या मागे उभे राहतात अन्…VIDEO एकादा पाहाच
Raigad Hindi speaking Bhajiwali Controversy shocking video goes viral after kalyan case
“मैं मराठी नही बोलूंगी…तुम हिंदी बोलो” यूपीच्या भाजीवालीची रायगडमध्ये अरेरावी; VIDEO पाहून तुम्हालाही येईल संताप
Shocking video in mumbai Waseem Amrohis Car Was Broken Into By Thieves Who Were Trying To Steal His Phone And Laptop Video Viral
तुम्हीही कार पार्क करुन बिनधास्त निघून जाता? अवघ्या सेंकदात बंद कारमध्ये कशी करतात चोरी पाहा; मुंबईतला VIDEO पाहून धक्का बसेल
kareena kapoor shahid kapoor photos
करीना कपूर-शाहिद कपूर बऱ्याच वर्षांनी दिसले एकाच फोटोत; नेटकरी म्हणाले, “जेव्हा तुम्ही तुमच्या एक्सला…”
Story img Loader