लोक कशा-कशासोबत सेल्फी घेतील याचा काही नेम नाही. पुतळे तर सोडून द्या अगदी गोठ्यात बांधलेल्या गुरांना देखील सेल्फी वेड्यांनी सोडले नाही. अशा महाभागांचे सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल होतात. व्हायरल तर सोडाच पण त्यांच्यावर विनोद करून त्यांचे हसे होते ते वेगळेच. हा सेल्फी म्हणजे याचे उत्तम उदाहरण आहे. या सेल्फीमध्ये दिसणारे महान व्यक्तीमत्त्व नेमके कोण हे कळले नसले तरी सोशल मीडियावर मात्र त्यांची चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. हेल्मेट घातले नाही म्हणून पोलिसांनी या दोन्ही दुचाकीस्वारांवर कारवाई केली. पण पोलिसांचे लक्ष नसताना हे दोघेही सेल्फी घेण्यात व्यस्त आहे. पोलीस अधिकारी दंडाची पावती फाडण्यात व्यस्त आहेत. तेव्हा हे दोघेही पोलिसांची नजर चुकवून त्यांच्यासोबत सेल्फी घेत आहेत. वेळ काय, प्रसंग काय याचे कोणतेही भान या दोघांनाही नाही त्यामुळे या दोघांना ‘सेल्फी ऑफ द इअर’चा पुरस्कारच द्या अशा टीका सोशल मीडियावर होत आहे. अशा प्रकारे सेल्फी काढणारे हे काही पहिलेच नाहीत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा