Team india victory parade: १४० कोटी भारतीयांचे स्वप्नपूर्ती करणाऱ्या टी-२० वर्ल्डकप विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे आधी राजधानी नवी दिल्ली आणि त्यानंतर मुंबईत मोठ्या जल्लोषात स्वागत झाले. विश्वविजेते झालेल्या आपल्या लाडक्या खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी मुंबईकरांनी तुफान गर्दी केली होती. नरिमन पॉईंट येथील ट्रायडंट हॉटेल पासून निघालेली हि विजययात्रा वानखेडे स्टेडियम पर्यंत पोहोचली. मात्र यावेळी चाहत्यांची जी गर्दी झाली होती ती ऐतिहासिक होती. मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात क्रिकेट चाहत्यांनी मोठी गर्दी केल्यामुळे संपूर्ण रस्ता बंद झाला अशी परिस्थिती होती. मात्र, एवढ्या मोठ्या गर्दीमधून एक वेगळं दृष्य पाहायला मिळालं आहे. मरीन ड्राइव्हवर जमलेल्या गर्दीत १० लाख लोक एकाच वेळी फक्त एका व्यक्तीचं नाव घेतं होते. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.
१० लाख लोक जेव्हा फक्त ‘त्या’ एकाचं नाव घेतात
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, अक्षरश: मुंग्यांसारखे लोक दिसत आहेत. लाखोंच्या संख्येने चाहते खेळाडूंची फक्त एक झलक पाहण्यासाठी उभे आहेत आणि या गर्दीत एका नावाचा जबरदस्त असा जयघोष ऐकायला मिळतोय. तो म्हणजे, “मुंबईचा राजा रोहित शर्मा ” मरीन ड्राइव्हवर १० लाख लोक एकाच वेळी रोहित शर्माच्या नावाचा जयघोष करत होते. जगज्जेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी मुंबईतील गर्दी पाहून भारत आणि महाराष्ट्रातील जनतेचं क्रिकेटवर किती प्रेम आहे? याचा प्रत्यय मुंबईतील गर्दी पाहिल्यानंतर येत आहे. दरम्यान, मुंबईत फक्त गर्दीच गर्दी दिसत असून अतिशय उत्साहाचं वातावरण आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> विराट-रोहितचे पाय थिरकले अन् संपूर्ण टीम इंडियाने डान्स करत केलं भन्नाट सेलिब्रेशन; वानखेडेवरील व्हायरल VIDEO
चर्चगेट-मरीन ड्राइव्ह परिसरात अनेक सरकारी, खासगी कार्यालय आहेत. कामावरुन निघाल्यानंतर या नोकरदार वर्गाचे पाय रेल्वे स्टेशनऐवजी आपसूकच ट्रायडंट हॉटेल, मरीन ड्राइव्हकडे वळले. लाखो लोक मरीन ड्राइव्ह परिसरात जमा झालेले होते. ही गर्दी पाहिल्यानंतर कोणी त्यात शिरण्याच धाडसही करणार नाही पण क्रिकेटवेडे कशाचीच पर्वा न करता त्या गर्दीत मिसळले होते. एवढी प्रचंड गर्दी असूनही त्यात एक शिस्त दिसत होती. मुंगी शिरायलाही वाव नाही असं वाटत असतानाच सायरन वाजत आलेल्या एका रुग्णवाहिकेसाठी लोकांनी झटपट बाजूला होऊन वाट करुन दिली. मुंबईकर हे उत्साह, स्पिरिट बरोबर माणुसकीसाठी सुद्धा ओळखले जातात. हीच माणसुकी त्या गर्दीमध्ये दिसून आली.