Viral Video: सोशल मीडियावर कधी कुठलं गाणं व्हायरल होईल हे सांगता येत नाही. जेव्हापासून रील्स बनविण्याचा ट्रेंड सुरू झाला तेव्हापासून सतत विविध भाषांतील विविध देशांतील नवनवीन गाणी व्हायरल होत असतात; ज्यावर लाखो लोक रील बनवतात. इतकंच नव्हे, तर ही गाणी अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही लावली जातात. नुकतंच काही दिवसांपूर्वी ‘पुष्पा : द रुल’ या आगामी चित्रपटातील ‘पुष्पा पुष्पा’ हे गाणं प्रदर्शित झालं होतं; जे सध्या खूप चर्चेत असून, या गाण्यातील हुक स्टेपची अनेकांना भुरळ पडली आहे. या गाण्यावर लाखो लोक रील्स बनवून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. फक्त सामान्य लोकच नाही, तर अनेक दिग्गज कलाकारांनीही या गाण्यावर रील्स तयार केल्या आहेत. अशातच आता या गाण्यावर एका तरुणीनं जबरदस्त डान्स केला आहे; जो पाहून तुम्हीही त्याचं कौतुक कराल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘पुष्पा : द रुल’ चित्रपटाच्या पहिल्या भागामधील गाण्यांनीदेखील अनेकांना वेड लावलं होतं. या गाण्यांतील अनेक हुक स्टेप्सदेखील सोशल मीडियावर खूप व्हायरल झाल्या होत्या. दरम्यान, आता ‘पुष्पा : द रुल’ चित्रपटातील ‘पुष्पा पुष्पा’ गाण्यातील एक हुक स्टेप सध्या खूप व्हायरल होतेय. समोर आलेल्या या व्हिडीओमध्येही एक तरुणी या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका तरुणीनं पिवळ्या रंगाची प्लेन साडी नेसली असून, त्यावर लाल रंगाचा ब्लाऊज आहे. डोळ्यांवर गॉगल लावलेल्या या तरुणीनं कानात झुमके आणि पायांत पांढऱ्या रंगाचे बूट घातले आहेत. अशा हटके लूकमध्ये ही तरुणी ‘पुष्पा पुष्पा’ गाण्यातील एक हुक स्टेप करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून युजर्स तिचं मोठ्या प्रमाणात कौतुक करताना दिसत आहेत.

हेही वाचा: मूर्ती लहान, पण कीर्ती महान; गेंड्याच्या पिल्लाने घेतला वाइल्डबीस्ट सोबत पंगा, Video पाहून माराल कपाळावर हात

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @_snehu_0301_official या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास ४० लाखांहून अधिक व्ह्युज आणि एक लाखाहून अधिक लाइक्सही मिळाल्या आहेत. त्यावर अनेक नेटकरीही कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यात एकानं लिहिलंय, “पुष्पा गर्ल फायर.” दुसऱ्या एकानं लिहिलंय, “लेडी पुष्पा आहेस तू.” तर आणखी एकानं लिहिलंय, “जरा हळू कर. गोविंदापण घाबरेल तुला पाहून.” आणखी एकानं लिहिलंय, “एकदम खतरनाक डान्स आहे तुझा.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This is lady pushpa a young woman wearing a sari dances to the song pushpa pushpa after viral video sap