Viral Video : दसरा हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण आहे. अश्विन शुद्ध दशमीला दसरा साजरा केला जातो. अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नवरात्र सुरू होते आणि दहाव्या दिवशी दसरा साजरा केला जातो. म्हणूनच दसऱ्याला विजयादशमी सुद्धा म्हणतात. आज देशभरात दसरा उत्साहाने साजरा केला जात आहे. या दिवशी आप्तस्वकीयांना आपट्याची पाने देत दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या जातात. यादिवशी शस्त्रपूजा केली जाते. या दिवशी प्रामुख्याने वाहने, काही वस्तू , मशीनची पूजा केली जाते.

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मुंबईतील लोकल ट्रेनची पूजा केली जात आहे. मुंबई लोकलमध्ये दसरा कसा साजरा करण्यात आला, हे तुम्हाला या व्हिडीओमध्ये दिसून येईल.

हेही वाचा : हेच खरे हिरो! १४१ प्रवाशांना विमानात तांत्रिक बिघाडानंतरही सुखरूप खाली उतरवणाऱ्या वैमानिकांवर कौतुकाचा वर्षाव; पाहा VIDEO!

हा व्हायरल व्हिडीओ मुंबई लोकलमधील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला काही कर्मचारी लोकल ट्रेन ड्रायव्हरचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करताना दिसेल. पुढे काही कर्मचारी आणि प्रवासी तुम्हाला लोकल ट्रेनमध्ये आरती करताना दिसतील. या दरम्यान प्रसादाचे वाटप सुद्धा केले आहे. विशेष म्हणजे लोकल ट्रेन फुलांनी खूप सुंदर रित्या सजवली आहे. पुढे व्हिडीओत तुम्हाला सजवलेल्या या लोकल ट्रेनमधून लोक प्रवास करताना दिसेल. हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. मुंबई लोकलमधला दसरा पाहून तुम्ही भारावून जाल.

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : “म्हणूनच मला मुंबई आवडते… ” बॅगमधून डोकावणाऱ्या मिन्नीला पाहून प्रवासी झाले खूश; VIRAL VIDEO पाहून तुमच्याही चेहऱ्यावर येईल हसू

akshita_ghone या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “दसरा with मुंबई लोकल” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हिच आमची संस्कृती आहे… आम्ही मराठी, मी पणा नाही करत पण वेळ आली आहे एकत्र येऊन त्यांना दाखवायची. छत्रपती शिवाजी महाराज की जय” तर एका युजरने लिहिलेय, “तुम्हारे बाप की प्रॉपर्टी है क्या ….. जर अस कोणी बोलले तर हक्काने बोला, हा आहे आमची मुंबई. मराठा” आणखी एका युजरने लिहिलेय, “सगळे मिळून एकत्र सण साजरा करतात. मुंबईकर, अभिमान आहे.” एक युजर लिहितो, ” हे फक्त मुंबईमध्ये बघायला भेटेल” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.