Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही लोकं पाळीव प्राण्यांचे व्हिडीओ शेअर करत असतात. कुत्रा, मांजर, बकरी गाय इत्यादी पाळीव प्राण्यांबरोबरचे व्हिडीओ सोशल मीडियावर आवडीने शेअर करतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक पाळीव नंदी बैल दिसत आहे. हा नंदी बैल पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या नंदीबैलचा लूक पाहून कोणीही भारावून जाईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्रातील परंपरा

महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये नंदीबैलाचे विशेष महत्त्व आहे. ही संस्कृती आणि परंपरा जपणारे नंदी बैल वाले भटकंती करुन काही जमाती उदरनिर्वाह करतात. संस्कृती जपून ठेवण्यात या लोकांचा मोठा वाटा आहे. बैलांचा खेळ दाखवून करमणूक करून हे लोकं भरतात.नंदी हे शंकराचे वाहन आहे त्यामुळे नंदीच्या रुपात साक्षात शंकर आल्याची भावना लोकांच्या मनात येते. नंदीबैलाला महाराष्ट्रात रंगवून सजवून गावागावात फिरवले जाते. ढोलकी वाजवून लोकगीते म्हणतात. गावातील लोकं या नंदी बैलाची पूजा करतात आणि नंदी बैल आणणाऱ्या व्यक्तीला शिधा किंवा दक्षिणा देतात.

हेही वाचा : “वाघाची कधी शेळी होईल असं वाटलं नव्हतं मला…” नवरदेवाने घेतला भन्नाट उखाणा, व्हिडीओ होतोय व्हायरल

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक सुंदर नंदी बैल दिसेल. या नंदीचा सुंदर श्रृंगार केलेला दिसत आहे.रंगबेरंगी कपड्याची झुल त्याच्या अंगावर घातली आहे. बैलाची शिंगं अतिशय मोठी असून त्यावर रेशमी रंगीबेरंगी कापड घातला आहे आणि या शिंगाच्या टोकास पितळेच्या शेंब्या घातल्या आहे. बैलाच्या मस्तकावर सुंदर बाशिंग बांधले आहे.बाशिंगावर मध्यभागी शिवलिंग आणि या शिवलिंगावर नागदेवता दिसतेय. गळ्यात घुंगरू आणि कवड्यांची माळ आहे. हा बैल अतिशय आकर्षत दिसत आहे. या नंदी बैलाशेजारी एक व्यक्ती उभी आहे. त्यांच्या हातात ढोलकी आहे. या नंदी बैलाचे आकर्षर रुप पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

prajwalmondkar या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “हर हर महादेव ” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आपली संस्कृती एवढी महान आहे की याची आपण कल्पना करूच शकत नाही. सनातन धर्म सर्वात श्रेष्ठ आहे.” तर एका युजरने लिहिलेय, “आमच्या येथे पण येतात नंदी..” आणखी एका युजरने लिहिलेय, “हीच आपली संस्कृती..व्हिडीओ पाहून अंगावर काटा आला.” अनेक युजर्सनी ‘हर हर महादेव’ लिहित कमेंट्समध्ये वर्षाव केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This is our tradition a decorated nandi bail video goes viral on social media ndj