“जन गण मन…अधिनायक जय हे…राष्ट्रगीताचे हे बोल कानावर पडताच प्रत्येक भारतीय नागरिक जिथे आहे तिथेच स्तब्ध अवस्थेत उभा राहतो आणि भारतीय राष्ट्रगीताचा मान राखला जातो. भारतीय राष्ट्रगीताचा मान राखणे प्रत्येक भारतीय व्यक्तींचे कर्तव्य आहे. शालेय वयापासून प्रत्येकालाच राष्ट्रगीत तोंडपाठ असते. आजच्या काळात शाळा, चित्रपटगृह किंवा काही कार्यक्रमांमध्ये राष्ट्रगीत गायले जाते पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, हैद्राबादमधील एका कॅफेमध्ये रोज सकाळी राष्ट्रगीत गायले जाते. या सुंदर क्षणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

हैदराबादच्या रामेश्वरम कॅफेमध्ये दररोज राष्ट्रगीत गायले जाते. कॅफे सकाळी ६:३० वाजता लोकांसाठी उघडतो. सकाळी साडेपाच वाजताच सर्व कर्मचारी राष्ट्रगीत सज्ज होतात. सर्वप्रथम, सर्वजण सावधान अवस्थेत उभे राहतात आणि समूह गायन करत राष्ट्रगीत गातात. त्यानंतर भारत माता की जयच्या घोषणाही दिल्या जातात. रात्री एक वाजेपर्यंत कॅफे सुरू राहतो.

Mother love Viral Video
‘शेवटी त्यालाही कळली आईची माया…’ मुलाला भेटण्यासाठी आतुर झालेल्या आईची ट्रेन गार्डने केली मदत; हृदयस्पर्शी VIDEO पाहून व्हाल भावूक
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
The viral video of the elephant attacking people is from the Puthiyangadi festival at BP Angadi mosque in Malappuram district
केरळमध्ये उत्सवादरम्यान पिसाळला हत्ती! व्यक्तीला सोंडेत पकडून हवेत फेकले; थरारक घटनेचा Video Viral
Viral Video
गर्लफ्रेंडचा वाढदिवस साजरा करण्यासाठी १२ गाड्यांचा ताफा घेऊन निघाला गँगस्टर, Video Viral होताच पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Tirupati stampede
Tirupati stampede : तिरुपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरी, सहा भाविकांचा मृत्यू
Russia paying students in cash to have babies
मुलं जन्माला घालण्यासाठी ‘या’ देशात विद्यार्थ्यांना का दिले जात आहेत पैसे? नेमका हा प्रकार काय?
How Wankhede Stadium Built| History and Significance of Wankhede Stadium Mumbai
Wankhede Stadium Mumbai: मराठी माणसाच्या अपमानातून उभं राहिलं वानखेडे स्टेडियम, मुंबईतील ऐतिहासिक स्टेडियमच्या जन्माची रंजक कहाणी
Billeshwar Mahadev temple UP Unnao
Mahabharata era Shivling damaged: महाभारतकालीन शिवलिंगाची विटंबना; अटक केलेल्या आरोपीनं सांगितलं धक्कादायक कारण

राष्ट्रगीताने सकारात्मकतेची सुरुवात होते

सकारात्मकता आणि एकतेने दिवसाची सुरुवात करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. रेस्टॉरंट व्यवस्थापनाचा असा विश्वास आहे की,”या पद्धतीमुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल तर वाढतेच पण ग्राहकांना एक विशेष संदेशही जातो.”

हेही वाचा –केरळमध्ये उत्सवादरम्यान पिसाळला हत्ती! व्यक्तीला सोंडेत पकडून हवेत फेकले; थरारक घटनेचा Video Viral

हेही वाचा – “हाथी चले बाजार, कुत्ते भौंके हजार!”असे म्हणतात, पण इथे तर उलटंच घडलं, Viral Video पाहून पोट धरून हसाल

सोशल मीडियावर चर्चा

ही बातमी व्हायरल झाल्यानंतर, एका सोशल मीडिया वापरकर्त्याने प्रश्न उपस्थित केला की, “ही परंपरा सर्व कार्यालये, मॉल्स आणि कामाच्या ठिकाणी देखील स्वीकारली पाहिजे का? त्यावर प्रतिक्रिया देताना अनेकांनी त्याचे कौतुक करून इतर ठिकाणी त्याची अंमलबजावणी करण्याची मागणी केली.

राष्ट्रगीत गाणे हे केवळ देशभक्तीचे प्रतीक नाही तर लोकांना एकत्र आणण्याचा आणि शिस्त लावण्याचा एक मार्ग आहे. रामेश्वरम कॅफेचा चा हा उपक्रम समाजातील सकारात्मक बदलाचे उदाहरण ठरू शकतो.

Story img Loader