Viral Video : प्रेम हे जगातील सर्वात सुंदर भावना आहे. आई मुलामध्ये असलेले प्रेम असो किंवा बहीण भावातील प्रेम असो, नवरा बायकोमधील प्रेम असो किंवा प्रियकर प्रेयसीमधील प्रेम असो, प्रेम हे प्रेम असतं. प्रेमासाठी जीव देणारे, त्याग करणारे अनेक प्रकरणे तुम्ही ऐकले असतील पण हल्ली प्रेमाची व्याख्या बदलताना दिसत आहे. विशेषत:प्रियकर आणि प्रेयसीच्या नात्यात हिंसाचार आणि अत्याचार वाढला आहे. नकार पचवता न आल्याने जोडीदाराची हत्या करणे, फसवणूक करणे, मानसिक त्रास देणे, अत्याचार करणे इत्यादी प्रकरणे तुम्ही गेल्या काही वर्षांमध्ये अनेकदा वाचली असतील आणि आजही ही प्रकरणे थांबलेली नाही.

सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण भर रस्त्यात त्याच्या प्रेयसीवर हात उचलताना दिसतो. कुणीतरी लपून हा व्हिडीओ शूट केला आहे. हा व्हिडीओ पाहून कोणालाही संताप येईल.

'Gir Mat Jaana': Viral MP Woman's Dance Fails To Impress Netizens funny video goes viral
गावच्या महिलेचा ट्रेंडिंग गाण्यावर तुफान डान्स; मारल्या अशा स्टेप की VIDEO पाहून पोट दुखेपर्यंत हसाल
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Two girls fighting at collage over a guy shocking video viral on social media
प्रेमासाठी काय पण! एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण
Video viral grandmothers dance performed on Pahun Jevla Kay song which famous for gautami patil lavani
“पाव्हणं जेवला का?” डोक्यावरचा पदर खाली पडू न देता आजीबाईंचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून म्हणाल “अशी पिढी पुन्हा होणे नाही”
Grandfather shifted the camera towards his wife
“नातं इथपर्यंत पोहचलं… ” आजी येताच आजोबांनी मोबाईल वळवला अन्…; VIRAL VIDEO पाहून नेटकरी झाले भावुक
Video Viral
“आयुष्यात कितीही मोठे व्हा पण वडिलांचे कष्ट कधी विसरू नका” बाप लेकीचा हा व्हिडीओ होतोय व्हायरल
a young man paati goes viral on social media
“..तेव्हाच मंदिरातील माऊली प्रसन्न होईल” तरुणाची पाटी चर्चेत, VIDEO एकदा पाहाच
Police found dead body of a boy in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला

हेही वाचा : VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये चोराची एक कृती अन् मिळाला लाथा बुक्क्यांचा प्रसाद; पर्स चोरताना चोराला कसा पकडला एकदा पाहाच

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुण आणि तरुणी रस्त्याच्या शेजारी एका चारचाकी गाडीच्या बाजूला उभे असलेले दिसेल. हे दोघेही भांडताना दिसत आहे. तरुण त्या तरुणीला जाब विचारताना दिसतो. पुढे काही क्षणात असे काही घडते की पाहून तुमच्या अंगावर काटा येईल. तरुण तिच्यावर दोन-तीनदा हात उचलताना दिसतो. तरुणी मात्र त्याचा हात पकडून रडताना दिसते. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही संताप येईल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “हे प्रेम आहे का?”

व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

kimi_4251 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शूट करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “जेव्हा आपण कोणावर प्रेम करतो तर आपल्याबरोबर असेच होते. पण खरं प्रेम करणे चुकीचे आहे का?”

हेही वाचा : जयपूरमध्ये हातात लाठ्या-काठ्या घेऊन शेकडो लोक उतरले रस्त्यावर? जातीय दंगलीचा दावा; लक्षात घ्या भयंकर घटनेची संपूर्ण खरी बाजू…

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी संताप व्यक्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मुलीचा आदर करा मुलांनो, यासाठी नाही की ती मुलगी आहे, पण यासाठी करा की तुमच्या आईने तुमच्यावर चांगले संस्कार केले आहेत.” तर एका युजरने लिहिलेय, “एकटी राहा पण कुणाचा मार सहन करू नका” आणखी एका युजरने लिहिलेय, “पाहून खरंच वाईट वाटतं पण मुली या गोष्टी का सहन करतात, माहित नाही.” एक युजर लिहितो, “माझी दोनदा फसवणूक झाली पण मी त्या मुलींवर कधीही हात उचलला नाही.” तर एक युजर लिहतो, “तुम्हीच सांगा यात चूक कुणाची?” अनेक युजर्सनी या तरुणावर संताप व्यक्त केला आहे.