स्वर कोकिळा लता मंगेशकर यांचे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात काल ७ फेब्रुवारी २०२२ रोजी निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. कोविड-१९ पॉझिटिव्ह आढळल्यानंतर मंगेशकर यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते, उपचारादरम्यान अवयव निकामी झाल्यानं त्यांचं निधन झालं. दरम्यान, लतादीदींच्या पार्थिवावर शिवाजी पार्क मैदानात शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. काल बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानही लता मंगेशकर याचं दर्शन घेण्यासाठी आला होता. मात्र शाहरुखने लतादीदींना अखेरचा निरोप देतानाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
लतादीदींच्या अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलेल्या मंचावर शाहरुख त्याची मॅनेजर पूजा ददलानीसोबत गेला. पुजाने हात जोडून तर शाहरुखने दुवाँ मागून लतादीदींना शेवटचा निरोप दिला. हा फोटो नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला. शाहरुखने दुवाँ मागितल्यावर पुढे हात जोडून नमस्कारही केला.
(हे ही वाचा: Lata Mangeshkar: लता मंगेशकरांना ‘या’ गाड्यांची होती आवड; कुटुंबासाठी मागे ठेवलीये इतकी संपत्ती)
शाहरुख खानच्या याच कृतीचं सगळीकडे कौतुक होत आहे. हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही पद्धतीने प्रार्थना केल्याने शाहरुख खानचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. त्याचा फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करून लोक त्याचं कौतुक करत आहेत.
(हे ही वाचा: Lata Mangeshkar: गानकोकिळा ते भारतरत्न; अमृत स्वरांनी अजरामर झालेला लतादीदींचा सुरेल प्रवास)
(हे ही वाचा: ‘ए मेरे वतन के…’ गाण्याचे लेखक कवी प्रदीप यांची जन्मतारीख आणि लता मंगेशकर यांचं निधन; अजब योगायोग)
लता दीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह सांस्कृतिक, कला, क्रीडा क्षेत्रांतील मान्यवर आणि संगीतप्रेमींची गर्दी लोटली होती.