उत्तर ध्रुव हा पृथ्वीच्या उत्तरेकडील सर्वात अखेरचा बिंदू आहे. उत्तर ध्रुवाला अतिशय सुंदर समजले जाते. येथील दृश्यं डोळयाचे पारणे फेडणारे असतात. युरोप यापासून खूप जवळ आहे. तर नॉर्वेचे शेवटचे टोक म्हणून याकडे पाहिले जाते. येथून पुढे जाणाऱ्या रस्त्याला जगातील अखेरचा रस्ता म्हणून ओळखले जाते. या रस्त्यावर एकटयाने प्रवास करणे हे धोकादायक आहे. असे असेल तरी शेकडो लोक या नयनरम्य परिसराला पाहण्यासाठी दरवर्षी उत्तर ध्रुवाचा प्रवास करत असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पृथ्वीचे शेवटचे टोक व नॉर्वेला जोडणाऱ्या या अखेरच्या रस्त्याला ई-६९ म्हटले जाते. सगळया कमी तापमान असलेल्या या भागात देखील मानवी वस्ती आहे. या रस्त्याच्या पुढे सगळीकडे फक्त बर्फ आणि बर्फच पाहायला मिळतं. त्यामुळे याला जगातील शेवटचा रस्ता म्हणून ओळखले जाते. या रस्त्यावर एकटयाने गाडी चालविण्यास मज्जाव केलेला आहे. कारण १४ किलोमीटर लांबीच्या या महार्गावर बेपत्ता होण्याची शक्यता खूप अधिक आहे. सर्व बाजूंनी बर्फ पसरलेला असल्याने या रस्त्यावरून लोक एकमेकांसोबत प्रवास करतात. १९३० पासून या भागात विकासाला सुरूवात झाली.

या भागातील लोक मच्छिमाराचा व्यवसाय करतात. १९३४ पासून हा भाग पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. उल्लेखनीय म्हणजे हिवाळयामध्ये याठिकाणी कधीही रात्र संपुष्टात येत नाही. तर संपूर्ण उन्हाळयात सुर्य मावळत नाही. खजिनांच्या समृद्ध अशा या भागावर निर्सगाचे अनोखे सौदर्यं पाहायला मिळते. वर्षाच्या अखेरला जगभरातील लोक याठिकाणी फिरण्यासाठी येतात.