इंटरनेटवर काही शोधायचे म्हटल्यास सर्वात आधी डोक्यात येतं ते नाव म्हणजे गुगल. जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असणाऱ्या गुगलने सालाबादप्रमाणे यंदाही वर्षभरातील ट्रेण्डसचा आढावा घेणारी माहिती जाहिर केली आहे. #YearInSearch या हॅटशॅटसहीत या वर्षी म्हणजेच २०१८ मध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील कोणत्या व्यक्ती चर्चेत राहिल्या या संदर्भातील वेगवेगळ्या विषयांनुसार अव्वल दहा जणांची यादीच गुगलने जाहीर केली आहे. विशेष म्हणजे यामध्ये मनोरंजन क्षेत्रातील जगभरात सर्वाधिक सर्च झालेल्या कलाकारांच्या यादीमध्ये भारतातील केवळ एक नाव आहे. आता तुम्हाला वाटलं असेल की हे नाव म्हणजे शाहरुख खान, आमिर खान, अमिताभ बच्चन किंवा दीपिका अथवा ऐश्वर्या राय वगैरे असेल पण नाही यापैकी कोणाचाही सर्वाधिक सर्च झालेल्या कलाकारांमध्ये समावेश नाहीय. जगभरात सर्वाधिक सर्च झालेल्या कलाकारांच्या यादीमधील ते एकमेव नाव आहे सपना चौधरी. याहून आश्चर्याची गोष्ट म्हणजे सपना चौधरीबद्दल सर्च करणाऱ्या भारतातील शहरांच्या यादीमध्ये उत्तर भारतीय शहरांबरोबरच पुण्याचेही नाव आहे.
Flashback 2018: अरे बापरे… पुणेकरांना आवडते ही अभिनेत्री!, गुगलचा वार्षिक अहवाल
गुगलने २०१८ चा वार्षिक अहवाल सादर केला आहे
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 12-12-2018 at 16:30 IST
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This is the only indian actors in top 10 google search results in