५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयामुळे आता भ्रष्टाचा-यांनी लपवलेला काळा पैसा या ना त्या मार्गाने समोर येत आहेत. या निर्णयानंतर पुण्यात एका महिला सफाई कामगाराला कच-यात रोख ५२ हजार रुपये सापडले. गंगेच्या पात्रातही ५०० आणि १००० च्या नोटा आढळल्यात. कोलकातामध्ये देखील एका गाडीत ५०० आणि १००० च्या नोटांचे तुकडे सापडलेत. तर मुंबईतही एकाने या नोटांना आग लावल्याची बातमी वा-यासारखी पसरली. गेल्या आठवड्याभरात अशा अनेक बातम्या फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स अॅपच्या मार्फत प्रत्येकाकडे फिरत आहेत असे असतानाच राजस्थानमधल्या एका व्यवसायिकाकडे तब्बल १३ कोटींचा काळा पैसा सापडला आहे अशी बातमीही व्हायरल झाली. ५०० आणि १००० च्या नोटांचे बंडल रचून ठेवलेली अनेक छायाचित्रे देखील सोशल मीडियावर फिरत आहेत. मोदींच्या निर्णयामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात हे काळे धन समोर आले अशी चर्चा रंगली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा