Viral Video : माणसाचा प्रिय प्राणी आणि एक चांगला मित्र म्हणून कुत्रा ओळखला जातो. अनेक जण आवड म्हणून कुत्रा पाळतात. काही लोकांना इतका कुत्रा प्रिय असतो की चालताना, बोलताना, झोपताना, अन् जेवताना ते कुत्र्याशिवाय एक मिनिट सुद्धा राहू शकत नाही. सोशल मीडियावर अनेक कुत्र्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकजण आवडीने त्यांच्या कुत्र्याचे मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतात. याशिवाय अनेकदा मोकाट कुत्र्यांचे सुद्धा व्हिडीओ चर्चेत येतात सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मोकाट कुत्रा खड्ड्यात पडलेला दिसत आहे आणि जेसीबी मशीनच्या साहाय्याने खड्ड्यात पडलेल्या या कुत्र्याचा जीव वाचवताना व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. काही लोकांना हा व्हिडीओ पाहून त्यांच्या कुत्र्याची आठवण येऊ शकते.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका खोल खड्ड्यात कुत्रा पडलेला दिसत आहे आणि हा कुत्रा वर येण्यासाठी खूप धडपड करत आहे. जेव्हा तिथे काम करणाऱ्या लोकांना हा कुत्रा खड्ड्यात खाली पडलेला दिसतो तेव्हा ते मदतीला धावतात .व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे एका जेसिबी मशीनच्या साहाय्याने या कुत्र्याची खोल खड्ड्यातून सुटका करण्यात आली आहे.सुरुवातीला जेसिबीच्या साहाय्याने कु्त्र्याला बाहेर काढताना कुत्र्याचा पाय घसरतो पण अखेर कुत्र्याला बाहेर काढण्यात यश येतं . कुत्रा बाहेर येताच लगेच पळून जातो.
आपल्या आजुबाजूला अनेकदा मुके प्राणी संकटात सापडतात. अशावेळी त्यांना मदत करणे, हीच खरी माणूसकी आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये सुद्धा जेसिबी चालकाने माणूसकी दाखवत कुत्र्याची सुटका केली.
हेही वाचा : शेवटी आईचं काळीज…! अंगावरुन ट्रेन जात असताना बाळाला वाचवण्यासाठी बनली ढाल, VIDEO पाहून तुमचाही उडेल थरकाप
Leela Ambedkar या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “माणूसकी, खड्ड्यात पडलेल्या कुत्र्याचा जीव वाचवला” अनेक युजर्सनी हा व्हिडीओ पाहून कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका युजरने लिहिलेय, “नेहमी असा दयाळूपणा असावा”
तर एका युजरने लिहिलेय, “कुत्रा आता खोदकाम करणाऱ्या जेसिबी चालकाचा खूप चांगला मित्र झाला असेल”