तुम्हाला प्रेम म्हणजे काय माहितीये का? नसेल तर आजी-आजोबांचा व्हिडीओ पाहा. खरं प्रेम म्हणजे काय हे समजेल. प्रत्येकाला आयुष्यात खरं प्रेम हवं असते पण खरं प्रेम काय हे माहित नसते. खरं प्रेम महागड्या गिफ्टमध्ये नसते की महागड्या रेस्टॉरच्या डेटमध्येही नसते. खरं प्रेम हे जोदीदाराची प्रत्येक परिस्थितीमध्ये साथ देण्यात असते. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत साथ देण्यात खरं प्रेम असते. एक घास वाटून खाणे म्हणजे खरं प्रेम असतं. हेच प्रेम तुम्हाला आजी -आजोबांच्या नात्यात पाहायला मिळेल.
आजच्या काळात ब्रेकअप, घटस्फोट आज काल सामान्य गोष्ट झाली आहे. अनेक लोकांचे नाते शुल्लक कारणावरून तुटते. अशा काळात म्हतारपणी एकमेकांना साथ देणारे जोडपे पाहिले की लक्षात येते की खरं प्रेम काय असते. नातं टिकवणे म्हणजे काय असते. सोशल मीडियाव अशाच एका आजी-आजोबांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक वयोवृद्ध जोडपे दिसत आहे. हे आजी-आजोबा एकाच ताटात जेवताना दसत आहे. आजी-आजोबांचे प्रेम पाहून नेटकरी भावूक झाले आहे. म्हातारपणी एकमेकांना साथ देणारे हे आजी-आजोबा पाहून लोकांना प्रेरणा मिळत आहे. आयुष्यात कितीही वाईट परिस्थिती आली तर जो शेवटपर्यंत साथ देतो तोच योग्य जोडीदार असतो. आयुष्यात असा जोडीदार असलेले लोक खूप भाग्यवान असतात.
हेही वाचा – ताई जरा सांभाळून! हात सोडून दुचाकी चालवतेय तरुणी, व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले
हेही वाचा – स्कुटर चालवताना मोबाईलवर बोलण्यासाठी काकूंचा हटके जुगाड! व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच
इंस्टाग्रामवर shreee_shiiv आणि prathamesh_bankhele_21 नावाच्या अकांऊटवर व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “परिस्थिती कशीही असू द्या साथ देणारे व्यक्ती पाहिजे.” तर स्क्रिनवर दिसणाऱ्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, आयुष्यात येणाऱ्या लोकांची कमी नाही. कमी असते त्या लोकांची जे शेवटच्या श्वासपर्यंत साथ देतात. हा व्हिडीओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. व्हिडीओवर नेटकऱ्यानी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिले की, “प्रेम खरे असेल तर शेवटच्या श्वासापर्यंत आपले कर्तव्य पार पडते” तर दुसऱ्याने लिहिले की, प्रेम म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये एकमेकांना समजून घेणे” तिसऱ्याने लिहिले की, असेच शेवटपर्यंत एकमेकांबरोबर राहा, हीच इश्वर चरणी प्रार्थना”