६० हजारांहून अधिक किंमतीचा आयफोन ७ जर तुमच्यापुढे कोणी हातोडीने तोडण्याचा प्रयत्न केला तर तुमची प्रतिक्रिया काय असेल ? किंवा आताच दुकानातून आणलेला हा फोन घेऊन कोणीतरी त्यावर धारधार सु-याने ओरखडे ओढण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही काय कराल ? तुम्ही असे करणा-याला ठार वेडे ठरवाल किंवा शिव्यांची लाखोली वाहाल. काहींना धक्काही बसेल. हा व्हिडिओ पाहणा-यांच्या प्रतिक्रिया काहिशा अशाच होत्या. ‘टेकरेक्स’चा आयफोन ७ चा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओत अक्षरश: आयफोन ७ ची वाट लावली आहे. आयफोन ७ लाँच झाल्यानंतर तो फोन आपल्याकडे असावा असे प्रत्येक अॅपल प्रेमींना वाटेल. खिशाला कात्री लावणारा फोन विकत घेतल्यानंतर कोणताही अॅपलप्रेमी तो जीवापाड जपत असणार यात वादच नाही. पण या व्हिडिओमध्ये अॅपलच्या नव्या को-या आयफोन ७ चे जे काही केले ते पाहून तुमच्याही कपाळाला आठ्या पडतील. यात नव्या को-या अॅपल आयफोन ७ ला सुरूवातीला सु-याने कापण्याचा प्रयत्न केला गेला. त्यानंतर त्याच्या स्क्रीनवर देखील सु-याने ओरखडे मारले पण हा व्हिडिओ येथेच थांबत नाही तर या फोनवर हातोडीने देखील वार करण्यात आले. आता इतके सगळे केल्यानंतर या फोनचे काय झाले हे पाहण्यासाठी मात्र तुम्हाला हा व्हिडिओच पाहावा लागेल.
सूचना – वरील व्हिडिओचे आम्ही समर्थन करत नाही.