भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. तो केवळ एखाद्या विषयावर आपले मतच मांडत नाही, तर फोटो आणि व्हिडिओ शेअर करून लोकांशी कनेक्ट होतात. आनंद महिंद्रा कधीकधी अशा प्रतिभावान लोकांचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करतात, ज्यांची कोणीही दखल घेत नाही. अलीकडेच, त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. हा व्हायरल फोटो तुम्हीही अनेकदा पाहिला असेल. हा फोटो शेअर करत भारतात सर्वात जास्त दुचाकींची निर्मिती का होते, याचं कारण त्यांनी सांगितलं.  

“हा फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की भारत जगात सर्वाधिक दुचाकी का बनवतो. दुचाकीवरील प्रति चौरस इंच जागेत जास्तीत जास्त सामान कसं न्यायचं हे आम्हाला माहीत आहे…आम्ही असेच आहोत…”, असं कॅप्शन देत आनंद महिंद्रा यांनी हा फोटो शेअर केला आहे.

या फोटोत दुचाकीवर एक जोडपं बसलंय. हे खुर्च्या विक्रीसाठी जात असल्याचं दिसतंय. या दुचाकीवर मागे मोठ्या संख्येनं खुर्च्या बांधल्या आहेत. पुढे चटईचा गठ्ठा ठेवलाय आणि त्यावर त्या माणसानं त्याच्या पत्नीला बसवलंय. एका छोट्याशा दुचाकीवर इतक्या वस्तू ठेवत हे जोडपं जाताना दिसंतय. त्यांनी दुचाकीवरील जागेचा पूर्णपणे वापर केल्याचं दिसतंय. त्यामुळे कमीत कमी जागेचा वापर कसा करून घ्यायचा हे आम्हाला चांगलं माहीत आहे, असं आनंद महिंद्रा म्हणाले.

Story img Loader