माजी क्रिकेटपटू आणि राजकीय नेते नवज्योतसिंग सिद्धू हे त्यांच्या भाषणामुळे नेहमीच चर्चेत असतात पण सध्या सोशल मीडियावर त्यांच्या मुलीची जोरदार चर्चा आहे. सिद्धू यांची मुलगी राबिया हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले असून त्या फोटोंनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रत्नानीने राबियाचं फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये ती अत्यंत सुंदर दिसत असून बॉलिवूड अभिनेत्रींनाही ती टक्कर देत असल्याची प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.
राबियाला पार्टी व फॅशनची फार आवड असून तिला भविष्यात फॅशन डिझायनर व्हायचे आहे. सध्या ती फॅशन डिझायनिंगमध्ये उच्च शिक्षण घेत आहे. दिल्ली, पटियाला, सिंगापूर, लंडन याठिकाणी तिने शिक्षण घेतलं आहे. फेसबुक व इन्स्टाग्रामवर सक्रिय असणारी राबिया येत्या काळात बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आणखी वाचा : कतरिनासोबत झळकली पूजा सावंत; मराठी कलाकार म्हणतात..
नवज्योतसिंग सिद्धू ‘द कपिल शर्मा शो’मध्ये परतणार असल्याची चर्चा रंगत आहे. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानची पाठराखण करणारे सिद्धू वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांची ‘द कपिल शर्मा शो’ मधून गच्छंती करण्यात आली होती.