अनेकदा ऑफिसमध्ये सुट्टी मिळवण्यासाठी खोटी कारण सांगावी लागतात. मग अगदी आजारी असल्यापासून ते खाजगी कारणाच्या नावाखाली कोणत्याही कारणाने ऑफिसला दांडी मारली जाते. पण जपानमधील एका कंपनी सिगरेट न ओढणाऱ्यांना कर्मचाऱ्यांना स्वत:हून वर्षाला ६ सुट्ट्या देते. धुम्रपान आरोग्यासाठी धोकादायक असते ते टाळले पाहिजे असे कंपनीचे धोरण आहे. त्यामुळेच सिगरेट न ओढणाऱ्यांना कंपनी हा आगळावेगळा बोनस देते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जगभरामध्ये अनेक देशांमधील लाखो लोक धुम्रपान करतात. धुम्रपान हे सिगरेट ओढणाऱ्याबरोबरच न ओढणाऱ्यांच्या आरोग्यासाठीही धोकादायक असते. सर्वच देशांमध्ये धुम्रपानाबद्दल जागृती केली जाते. आपल्याकडेही सिगरेटच्या पाकिटांपासून ते टीव्ही, रेडिओ, वृत्तपत्रे, समाजमाध्यमांच्या मदतीने धुम्रपान करु नये अशी जनजागृती केली जाते. जपानमध्येही सरकारने लोकांना धुम्रपानापासून परावृत्त करण्यासाठी सिगरेटवरील कर वाढवला. इतके सारे प्रयत्न होत असतानाही धुम्रपान करणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. म्हणूनच यावर जपानमधील एका कंपनीने एकदम भन्नाट उपाय शोधून काढला आहे. पिआला इंक या कंपनीनं अनोख्या पद्धतीनं धुम्रपानविरोधी मोहिम हाती घेतली आहे. कर्मचाऱ्यांनी सिगरेट ओढणं सोडून योग्य आणि आरोग्यदायी चांगलं जीवन जगावं असं कंपनीनं या मोहिमेबद्दल बोलताना म्हटलं आहे. धुम्रपान करणाऱ्यांना रोकण्याऐवजी जे धुम्रपान करत नाहीत अशा कर्मचाऱ्यांना सुट्टीमध्ये सवलत देण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. कंपनीत काम करणारे जे कर्मचारी सिगरेट ओढत नाहीत त्यांना वर्षाला ६ जास्त सुट्ट्या देण्यात येत आहेत. हा निर्णय घेण्यामागे एक वेगळे कारण असल्याचेही कंपनीचे म्हणणे आहे. एका कर्मचाऱ्याने केलेल्या तक्रारीवर विचार केल्यानंतर नॉनस्कोमकर्सला अधिक सुट्टी देण्याचा निर्णय कंपनीने घेतला. या तक्रारीमध्ये एका कर्मचाऱ्याने धुम्रपान करणारे कर्मचारी जास्त वेळा ब्रेक घेतात आणि त्यामुळे कामाचा वेळ वाया जातो ही गोष्ट कंपनी व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून दिली. पिआला इंक कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ही तक्रार गांभीर्याने घेत धुम्रपान करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी धुम्रपान न करणाऱ्यांना अधिकच्या सहा सुट्ट्या देण्याचा निर्णय घेतला. यामुळे कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांना लगेच सिगरेट ओढण्याची सवय सोडून दिली. इतर कर्मचारीही तब्बेतीसाठी नाही तरी अधिकच्या सुट्ट्यांसाठी धुम्रपान सोडतील अशी कंपनीला अपेक्षा आहे.

एका ऑनलाईन सर्वेक्षणानुसार जपानमधील १८ टक्के नागरिक सिगरेट ओढतात. जपानमध्ये एका वर्षात केवळ धुम्रपानामुळे एक लाख ३० हजार नागरिकांचा मृत्यू होतो.