सोशल मिडियावर अनेकांचे डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. प्रत्येकाचा डान्स एकापेक्षा वरचढ असतो. पण सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे ज्यामध्ये महिलेचा नृत्य पाहून सर्वांना धक्का बसला आहे. या व्हिडिओमध्ये महिला नेक डान्स करताना दिसत आहे जे पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

व्हायरल व्हिडीओ इंस्टाग्रामवर natureferver पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये परदेशातील एक महिला नाचताना दिसत आहे. ही महिला तिची मान खांद्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत घेऊन नेताना दिसत आहे. डान्स करताना ती १८० अंशाच्या कोनामध्ये उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे मान फिरवताना दिसते आहे. काही वेळाने ती महिला तिची मान गोल गोल फिरवताना दिसते. हे पाहून सर्वांना प्रश्न पडतो आहे की , महिलेने अखेर हा डान्स काय केला? व्हिडीओ पाहून तुमचीही मान दुखायला लागेल.

हेही वाचा – चालत्या बूलेट ट्रेनमध्ये कुस्तीपटूंची WWE स्टाइलमध्ये मारामारी; प्रवाशांनी लुटाला सामन्याचा आनंद, पाहा Viral Video

हेही वाचा- जिद्दीला सलाम! दिवसभर फार्मा कंपनीमध्ये करते जॉब, ऑफिस सुटताच विकते पास्ता, ‘या’ तरुणीची प्रेरणादायी कथा एकदा वाचा

सोशल मीडियावर यूजर्स व्हिडीओवर लोकांच्या संमीश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. काहींना व्हायरल व्हिडीओ एडीट केलेला आहे असे वाटत आहे. काहींनी असे सांगितले की, ज्या क्षणी महिला तिची मान फिरवते आहे त्याच वेळी तिच्या मागील भिंतीवर असलेला वॉलपेपरही अस्पष्ट दिसतो आहे. पण महिलेचा आणखी एक व्हिडीओ ज्यामध्ये ती असाच नेक डान्स करताना दिसत आहे जे पाहून लोक तिचे कौतूक करत आहे. काही लोक तिच्या डान्स कौशल्याचे कौतूक करत आहे.

Story img Loader