करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी देशभरात लॉकडाउन लागू करण्यात आलं होतं. आजही देशात विषाणूचा प्रादुर्भाव असलेल्या भागांमध्ये लॉकडाउन सुरुच आहे. मात्र इतर भागांत सरकारने अर्थव्यवस्थेला गती मिळावी यासाठी काही दुकानं सुरु करण्याची परवानगी दिली आहे. काही भागांमध्ये हॉटेल व्यवसायिकांनाही सर्व नियमांचं पालन करुन होम डिलीव्हरी सर्विस सुरु करण्याची परवानगी दिली आहे. जोधपूरमधील एका रेस्टॉरंटने आपल्या हॉटेलमध्ये ‘कोविड करी’ आणि ‘मास्क नान’ असा एक खास पदार्थ आणला आहे.
जोधपूरमधील Vedic multi-cuisine या रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ सुरु करण्यात आला आहे. कोविड करी हा मलई कोफ्त्याचा एक प्रकार असून यात कोफ्त्यांना कोविड विषाणूच्या आकारात बनवण्यात येत आहे. तर हॉटेलमध्ये मिळणारे नानही मास्कच्या आकाराचे बनवण्यात येत आहेत. करोनामुळे सध्या लोकं बाहेर पडण्यासाठी घाबरत आहेत. त्यामुळे जोधपूरमधील या रेस्टॉरंटने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अशा पद्धतीचे नवीन पदार्थ बनवण्यास सुरुवात केली आहे.
Mask-shaped naan with 'corona-curry'!
Kha lo fraaands pic.twitter.com/dWriTv60FC
— NationFirst#SAFFRON (@Nationfirst0012) July 31, 2020
“ग्राहकांच्या तब्येतीची आणि सुरक्षेची काळजी घेणं हे आमचं पहिलं कर्तव्य आहे. स्वच्छता आणि होम डिलेव्हरी दरम्यान आम्ही सर्व नियमांचं पालन करत आहोत. सर्व नियमांचं पालन करुन नवनवीन पदार्थ ग्राहकांसाठी आणण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं रेस्टॉरंटने मालकाने म्हटलं आहे.