घड्याळात वाजले सहा, आईने केला चहा…चहा पिण्यात एक तास गेला, मी नाही अभ्यास केला. हे गाणे लहानपणी आपल्यातील सगळ्यांनीच म्हटले किंवा ऐकले तरी असेल. घरचा अभ्यास न करण्याला कारणे देणारे लहानगे आपण आजुबाजूला नेहमीच पाहतो. त्यातही लहान मुलांना होमवर्क द्यावा की नाही याबाबत पालक आणि शिक्षक यांच्यात अनेकदा वाद सुरु असतात. घरचा अभ्यास दिल्याने मुलांचा विकास होतो असे म्हणणारा एक वर्ग असला, तरीही घरच्या अभ्यासामुळे मुलांना ताण होतो असेही म्हणणारा एक वर्ग आहे. मात्र या सगळ्याबाबत लहान मुलांचे काय म्हणणे आहे हे विशेष विचारात घेतला जात नाही.
मात्र कॅलिफोर्नियातील एका लहानग्याने या विषयात आपण स्वत:च लढायचे ठरवले. त्याने आपल्या शिक्षकांना होमवर्क का नको हे सांगणारे पत्रच लिहून पाठवले. त्याचे हे पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या पत्राचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. बऱ्याच विस्तृत असलेल्या या पत्रात एडी म्हणतो, मला साप्ताहिक सुटीच्या दिवशी अभ्यास करायला आवडत नाही. कारण ही सुटी ताणापासून दूर राहण्यासाठी असते. तसेच होमवर्कमुळे मी दु:खी होतो. विशेष म्हणजे या मुलाने यासाठी एक उदाहरणही दिले आहे. खऱ्या जीवनात तुम्ही बॉस किंवा शिक्षक नसाल तर नोकरी करत असताना तुम्हाला होमवर्क करावा लागत नाही.
So my cousin and his wife got an email from their sons teacher. He didn’t do his hw so she asked him to write a paper saying why he didn’t do his hw and this is what she got…
त्याला नेटीझन्सकडून मोठी पसंती मिळत असून त्याच्या या पत्रामुळे त्याच्यावर प्रेम आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्याचे म्हणणे अतिशय योग्य आहे आणि त्याचा गांभीर्याने विचार करावा असे मत अनेकांनी आपल्या प्रतिक्रियांमध्ये मांडले आहे.