भारतात टॅक्सी चालवून आपल्या कुटुंबियांचे पोट भरणारे अनेक चालक आहेत, पण दुस-यांचे भविष्य घडवण्यासाठी दिवसरात्र टॅक्सी चालवणारा टॅक्सी चालक पाहिलात का कधी? कोलकाताच्या रस्त्यावर अनेक पिवळया टॅक्सीची वर्दळ असते, या हजारो टॅक्सींपैकी गाजी जलालुद्दीन यांची एक टॅक्सी. रोज प्रवाशांना इच्छित स्थळी सोडून ते पैसे कामावतात पण हे पैसे स्वत:साठी नाही तर अशा अनेक विद्यार्थ्यांसाठी ते खर्च करतात ज्यांना परिस्थितीअभावी योग्य शिक्षण घेता येत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गाजी जलालुद्दीन हे पश्चिम बंगालमधल्या जयनगर जिल्ह्यात दोन शाळा चालवतात. या शाळेत अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. गाजी ६५ वर्षांचे आहे. घरची परिस्थिती हालाखीची होती. अभ्यासात गाजी हुशार होते, शिकून त्यांना मोठे व्हायचे होते, चांगलं करिअर घडवण्याचे त्यांचे स्वप्न होते. पण गरिबीमुळे त्यांना शाळा सोडावी लागली. गेल्या वीस एक वर्षांपासून गाजी टॅक्सी चालवतात. टॅक्सी चालवून त्यांना जितकी रक्कम मिळते त्यातली अर्ध्याहूनही अधिक रक्कम या मुलांच्या शिक्षणासाठी ते खर्च करतात. परिस्थितीमुळे मी शिकलो नाही पण या मुलांवर तशी वेळ येऊ नये एवढाच त्यांचा प्रयत्न आहे आणि म्हणूनच या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी ते धडपडत आहेत. या कामात त्यांना काही लोकांची मदतही मिळते, त्यांच्या टॅक्सीतून प्रवास करणारे स्वच्छेने या शाळेसाठी मदत करतात. गाजींच्या प्रयत्नातून सुरू झालेल्या या शाळेत एक हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात.